Signboards on Madgaon Karwar Road Dainik Gomantak
गोवा

मडगाव-कारवार हमरस्त्यावरील दिशादर्शक फलक लपले झाडीत

अपघातांना निमंत्रण; फलक मोकळे करण्याची वाहनचालकांची मागणी

दैनिक गोमन्तक

काणकोण : काणकोण मधील मडगाव-कारवार हमरस्त्याच्या कडेला असलेले दिशादर्शक फलक झाडीत लपल्याचं चित्र आहे. दिशादर्शक फलक गर्द झाडीत लपल्याने अपघातांना निमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाहन चालकांना रस्त्यावरील आडवळणे रस्ता दुभाजक यांचा अंदाज येत नसल्याने बाहेर गावचे वाहन चालक बुचकळ्यात पडतात. यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. दिशादर्शक फलकांच्या आजूबाजूला वाढलेली झाडे आणि वेली कापून ते फलक मोकळे करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे.

पोळे ते करमलघाट क्षेत्रात असे अनेक दिशादर्शक फलक झाडीत लपल्याने त्यांचे अस्तित्वच दिसत नाही. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला झाडे वाढलेली असल्याने काही वेळेला समोरून येणारे वाहनही दिसत नाही. त्यासाठी रस्त्याकडेची झुडूपे कापून रस्ता मोकळा करण्याची मागणी सातत्याने वाहनचालकांकडून होत आहे. पोळे ते माशेपर्यंत असे अनेक दिशादर्शक फलक झुडूपे आणि वेलीनी वेढलेले असल्याचा माशेतील स्थानिकांचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT