Goa Shigmotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023: रात्री 10 पर्यंत शिगमा अशक्‍यच!

वेळ वाढवून द्या : अखिल गोवा शिगमोत्सव समितीचे पदाधिकारी एकवटले

गोमन्तक डिजिटल टीम

शिगमोत्‍सव मिरवणुकीसाठी रात्री १० पर्यंतची सरकारने दिलेली वेळ अपुरी आहे. या वेळेत रोमटामेळ व चित्ररथ सादरीकरण होऊच शकत नाही. त्‍यामुळे ही वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी अखिल गोवा शिगमोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कुडचडे येथे आज रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी सावर्डे येथील श्री मंडलेश्‍‍वर माणगुरू शिगमोत्सव मंडळाचे शुभम नाईक, सावर्डे शिगमोत्सव मंडळाचे नीलेश तारी, साईश नाईक, केपे येथील चंद्रेश्र्वर भूतनाथ शिगमोत्सव मंडळाचे दीपराज नाईक, खांडेपार शिगमोत्सव समितीचे पंकज जल्‍मी तसेच इतर शिगमोत्सव मंडळांचे सदस्य उपस्थित होते.

गोवा पर्यटन खात्यातर्फे दरवर्षी शिगमोत्सव मिरवणुकीचे आयोजन केले जाते. पण यावर्षी वेळेचे जे बंधन घातले आहे, ते ऐकून आम्हाला आश्चर्य वाटल्‍याचे नीलेश तारी यांनी सांगितले.

शिगमोत्सव हा गोव्यातील एक पारंपरिक व मोठा उत्सव आहे. आम्ही फक्त बक्षिसे मिळविण्यासाठी मिरवणूक सादरीकरण करीत नाही, तर ही संस्कृती टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी बरेच अंतर असते. त्‍यामुळे रोमटामेळ सादरीकरण करण्यासाठी बराच त्रास होतो. त्‍यामुळे अंतर कमी असावे, अशीही मागणी नीलेश तारी यांनी केली.

रात्री १२ वाजेपर्यंत तरी वेळ हवाच

रोमटामेळात सहभागी होणारे युवक व युवती अनेक ठिकाणी कामाला असतात. आपले काम सांभाळून नंतर ते रोमटामेळ सादरीकरणासाठी येत असल्याने वेळ होतो. त्‍यामुळे जे वेळचे बंधन घातले आहे, हे ठीक नसून रात्री १२ वाजेपर्यंत तरी किमान वेळ वाढवून दिला पाहिजे.

पारंपरिक शिगमोत्सवातील कला जिवंत ठेवण्यासाठी आता बरेच पंगड झालेले आहेत. प्रत्येकाला सादरीकरणासाठी वेळ मिळत नसेल तर शिगमोत्सवात सहभागी होऊन फायदाच काय? असा सवाल सूरज परब यांनी उपस्‍थित केला.

विजेत्‍या रोमटामेळ पथकांसाठी जी बक्षिसे दिली जातात, ती खूपच कमी रकमेची असतात. त्‍यामानाने चित्ररथांसाठी दिली जाणारी बक्षिसे मोठी असतात. रोमटामेळांसाठी बक्षिसांची रक्कम वाढवून दिली पाहिजे. रोमटामेळाची तयारी करण्यासाठी दोन महिने तरी लागतात व खर्चसुद्धा बराच असतो.

- हरीश काकोडकर, शिगमोप्रेमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

SCROLL FOR NEXT