Siddhi Naik Murder Case Dainik Gomantak
गोवा

Siddhi Naik Murder Case: दोन वर्षे उलटली तरी सिद्धी नाईक मृत्यूचा छडा लागला नाही; मुख्यमंत्री म्हणतात....

गोवा पोलीस हे प्रकरण हाताळण्यात संथ आणि संकोच करत असताना, फॉरेन्सिक निष्कर्षांसह या प्रकरणाची स्थिती लपवून ठेवण्यात आली असल्याचे बोलण्यात येत आहे.

Kavya Powar

Siddhi Naik Murder Case: सिद्धी नाईकच्या मृत्यू प्रकरणाने एकेकाळी संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. तिच्या मृत्यूच्या तपासाची स्थिती गोवा विधानसभेत मांडण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे.

गोवा पोलीस हे प्रकरण हाताळण्यात संथ आणि संकोच करत असताना, फॉरेन्सिक निष्कर्षांसह या प्रकरणाची स्थिती लपवून ठेवण्यात आली असल्याचे बोलण्यात येत आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि माहिती उघड केल्याने तपासात अडथळे येऊ शकतात.

ऑगस्ट 2021 मध्ये, सिद्धी नाईकचा कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला, ज्यामुळे तिचे कुटुंब आणि संपूर्ण राज्य हादरून गेले होते. जवळपास दोन वर्षांनंतरही, तिच्या मृत्यूमागील नेमके कारण कळू शकले नाही. तिची हत्या झाली असल्याचे मत कुटुंबीयांनी व्यक्त केले आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये, गुन्हे शाखेने या घटनेचा क्लोजर रिपोर्ट दाखल करणे अपेक्षित होते, कारण त्यांना हत्येकडे निर्देश करणारा कोणताही पुरावा सापडला नव्हता. मात्र, या निर्णयावर तिच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या आक्षेपामुळे अहवाल लांबणीवर पडला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्वत:च्या गुणवत्तेवर करण्यासाठी गोवा पोलीस सुसज्ज असल्याचे सांगत हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यासही सरकारने नकार दिला.

या प्रकरणाचा तपास गोवा पोलीस करू शकतात, त्यामुळे तपास सीबीआयकडे सोपवण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले होते. त्यामुळे 2 वर्षे उलटली असली तरी या प्रकरणाचा छडा लावण्यात सरकारला यश आले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT