पणजी : कुंभारजुवेतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सिद्धेश नाईक यांचा विरोध अखेर मावळला आहे. सिद्धेश यांचे वडिल आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर तिठा सोडवण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपने या उमेदवारीच्या बदल्यात सिद्धेश नाईक यांना सचिवपदी नियुक्त केलं आहे.( Siddhesh Naik BJP News Updates)
भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांचा सिद्धेश नाईक यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे बंड करत त्यांनी कुंभारजुवा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. तसेच कुंभारजुवा मतदारसंघातील भाजप उमेदवार जेनिता मडकईकर यांना मतदान न करण्याचं आवाहनही मतदारांना केलं. भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सिद्धेश यांचा विरोध मावळला आहे.
कुंभारजुवेतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय सिद्धेश यांनी मागे घेतला आहे. भाजप ( BJP) पक्षासोबत राहण्यास आपण तयार असल्याचं सिद्धेश यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर लागलीच सिद्धेश नाईक यांची भाजपच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी ही घोषणा केली आहे. सिद्धेश यांना वास्को मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. जेनिता यांना आपण पाठिंबा देत असल्याचंही सिद्धेश यांनी स्पष्ट केलं आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.