BJP

 

Dainik Gomantak

गोवा

पेडणे मतदारसंघातून श्याम धारगळकर यांचा भाजप उमेदवारीवर दावा

दैनिक गोमन्तक

धारगळ येथील श्याम आत्माराम धारगळकर (Shyam Dhargalkar) यांनी पेडणे मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवारीवर दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे, की मी भाजपाचा 1994 पासून सक्रीय कार्यकर्ता आहे. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या लोकसभेच्या उमेदवारीवेळी मी त्यांचा कार्यकर्ता होतो. धारगळ मतदारसंघात आपले बंधू स्व. बाळकृष्ण धारगळकर भाजपाच्या (BJP) तिकीटावर उभे राहिले होते तेव्हा आपण त्यांना निवडून आणण्यासाठी कष्ट घेतले होते व ते अवघ्या मतांनी पराभूत झाले होते.

2012 ते 2017 या काळात मी मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय मंडळाचा संचालक होतो. भाजपा मागासवर्गीय मोर्चाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. श्रीपाद नाईक यांच्यासाठी मी लोकसभा निवडणुकीत काम केले आहे आणि मुख्यतः मी स्थानिक उमेदवार असल्याने मला भाजपाने उमेवारी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मनोहर (बाबू) आजगावकर (Manohar Ajgaonkar) यांनी पेडणे मतदारसंघासाठी विशेष काही केले नाही. फक्त आपला स्वार्थ साधला. अवघ्या मर्जीतील कार्यकर्त्यांकडेच ते लक्ष देतात. निवडून आल्यावर त्यांना भाजपात मंत्रिपद मिळाले नाही, तर ते दुसऱ्या पक्षात उडी मारायला पुढे असतील, असा आरोपही श्याम धारगळकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

Goa Today's News Live: दक्षिण गोव्यातील स्विगी डिलिव्हरी बॉईज संपावर

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT