shubham Chodankar Gomantak Digital Team
गोवा

Goa BJP : चोडणकरांच्या राजीनाम्यापूर्वीच मंडळ अध्यक्षपद कोणाला?

कार्यकर्त्यांत चर्चा : शांताराम नाईक यांचे नाव आघाडीवर

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष शुभम चोडणकर यांनी पदमुक्त होण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. ते कोणत्याही क्षणी वरिष्ठांकडे आपला राजीनामा देऊ शकतात, परंतु ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त ‘गोमन्तक’मध्ये शनिवारी प्रसिद्ध होताच त्या जागी आता कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.

माजी महापौर तथा नगरसेवक चोडणकर यांनी वैयक्तिक कारणास्तव पणजी भाजप मंडळाच्या अध्यक्षपदापासून अलिप्त राहण्याचे ठरविले आहे.

परंतु सध्या पणजी शहरात सुरू असलेल्या कामांमुळे त्रस्त नागरिक व मूळ भाजपचा असलेला मतदार आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याकडे जात नाही. हे नागरिक भाजप मंडळ अध्यक्ष म्हणून चोडणकरांकडे तक्रारी मांडत होते.

कदाचित या तक्रारींना कंटाळून त्यांनी दूर होण्याचे ठरविले असावे, असा अंदाज आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता, त्यावर चोडणकर यांनी न बोलणे पसंत केले.

चोडणकर पदापासून दूर जाणार असल्याने त्या जागी शांताराम नाईक, नगरसेवक वसंत आगशीकर, उपमहापौर संजीव नाईक यांची नावे पुढे आली आहेत, परंतु शांताराम नाईक यांचे पारडे जड मानले जाते. कोणत्याही पक्षीय कार्यक्रमात ते सक्रिय सहभागी असतात. त्याशिवाय सर्व नेत्यांशी त्यांची जवळीक आहे.

‘गोमन्तक’मधील वृत्तानंतर फोन...

शुभम चोडणकर पणजी भाजप मंडळाचे अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर चोडणकर यांना अनेकांनी फोन करून खातरजमा केल्याची माहिती हाती आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

'माझे पोलीस स्टेटमेंट माध्यमांमध्ये कसे लीक झाले'? रामा यांच्या पत्नीची पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार

Goa Politics: 'आप'च्या राजकारणाची स्क्रिप्ट उघड! "छुपे साटेलोटे नेत्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत", काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

Yashasvi Jaiswal: शुभमन गिलनंतर आता यशस्वी जैस्वालचाही 'कॅप्टन'पदावर डोळा; म्हणाला, "मला पण कर्णधार बनायचयं!"

SCROLL FOR NEXT