Goa Government job Dainik Gomantak
गोवा

Cash For Job: 'श्रुती'चे जाळे मडगावपर्यंत! प्रतिष्ठित व्‍यावसायिकाला 20 लाखांचा गंडा

Shruti Prabhugaonkar Case: ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्‍यात फोंडा पाेलिसांनी अटक केलेल्‍या श्रुती प्रभुगावकर हिच्‍या कारनाम्‍याला मडगावचेही काही लोक बळी पडले आहेत, अशी माहिती आता पुढे येऊ लागली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Shruti Prabhugaonkar Cash For Job Margao Businessman Case

मडगाव: ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्‍यात फोंडा पाेलिसांनी अटक केलेल्‍या श्रुती प्रभुगावकर हिच्‍या कारनाम्‍याला मडगावचेही काही लोक बळी पडले आहेत, अशी माहिती आता पुढे येऊ लागली आहे. मडगावच्‍या एका प्रतिष्‍ठीत अशा व्‍यावसायिकाच्‍या मुलाला सरकारी नाेकरी देते, असे सांगून या महिलेने त्‍यांच्‍याकडून २० लाख रुपये घेतले होते, अशी माहिती पुढे आली आहे.

या प्रकरणात अजूनही कुठल्‍याही पोलिस स्‍थानकात तक्रार देण्‍यात आलेली नसली तरी सदर व्‍यावसायिक काही राजकारण्‍यांच्‍या संपर्कात असून या प्रकरणात कदाचित यापुढे तक्रार नोंद होऊ शकते, असे सांगितले जाते.

दरम्‍यान, हे पैसे श्रुती प्रभुगावकर हिने आपल्‍याकडे ठेवले की, अन्‍य कुणाकडे पोचते केले, यासाठी तिच्‍या कॉल डिटेल्‍सची सखोल चौकशी करावी. हे पैसे दिल्‍याच्‍या आणि तिला अटक होईपर्यंतच्‍या कालावधीत ती कुणा कुणाच्‍या संपर्कात होती, हे सर्व या कॉल डिटेल्‍समधून पोलिसांना कळेल, असे सांगितले जाते.

पाेलिसांनी हे कॉल डिटेल्‍स तपासावेत आणि त्‍याची माहिती सामान्‍य जनतेसाठी उपलब्‍ध करावी, अशी मागणी यापूर्वी बाणावली येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ‘आप’ चे प्रदेश निमंत्रक अमित पालेकर यांनी केली होती. असे केल्‍यास या घाेटाळ्‍यात भाजपचे कुठले नेते आणि कार्यकर्ते सामील आहेत ते उघड होईल, असे त्‍यांनी म्‍हटले होते.

पैसे देऊन नोकरी मिळविणाऱ्यांचे काय?

सध्‍या जी प्रकरणे उघडकीस येताहेत ती फक्‍त सरकारी नोकरीसाठी पैसे देऊन जे फसले गेले आहेत, त्‍यांचीच. पैसे देऊन गोव्‍यात सरकारी नोकरी मिळते हे उघड सत्‍य असून यापूर्वी कित्‍येकांनी असे पैसे देऊन सरकारी नाेकरी विकत घेतली असेल. त्‍यामुळे काही पात्र नसलेल्‍या उमेदवारांना गैरमार्गाने या नोकऱ्या मिळाल्‍या हे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे अशा नोकऱ्या कुणाला मिळाल्‍या आहेत, त्‍यांचीही चाैकशी झाली पाहिजे, अशी मागणी निवृत्त सनदी अधिकारी एल्‍विस गोम्‍स यांनी ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात केली.

सरकारी नोकरी देण्‍यासाठी ज्‍यांनी पैसे घेतले, ते गुन्‍हेगार आहेतच पण भ्रष्‍टाचार प्रतिबंधक कायद्याखाली लाच घेणे आणि लाच देणे हे दोन्‍ही प्रकार गुन्‍हेगारी स्‍वरुपाचे मानले जातात. त्‍यामुळे ज्‍यांनी लाच दिली, तेही एकप्रकारे गुन्‍हेगार हाेतात. त्‍यामुळे दोन्‍ही बाजूने पोलिसांनी या प्रकरणी तपास करण्‍याची गरज आहे. असे झाल्‍यास लाच देणाऱ्यांवरही काही प्रमाणात जरब बसेल आणि भविष्‍यात असे प्रकार होणे कायमचे बंद होईल.
ॲड. अमेय प्रभूदेसाई, मडगाव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Retirement: क्रिकेटपटूची तडकाफडकी निवृत्ती! Asia Cup 2025 पूर्वी 'या' खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला रामराम

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यास रोखलं म्हणून गोळी घातली; अमेरिकेत भारतीय तरुणाचा खून

Nepal Protest: राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, गृहमंत्र्यांच्या घराला लावली आग! नेपाळमध्ये राडा सुरुच; PM ओली सोडणार देश?

Goa Chess: 38व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वाढली चुरस! शौनक, दीक्षिता विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर

Rohit Sharma: मुंबईच्या राजाला झालंय तरी काय? 'हॉस्पिटल'मधल्या व्हिडिओमुळं चाहते टेन्शनमध्ये Watch Video

SCROLL FOR NEXT