Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेस राजवटीत घोटाळेच; श्रीपाद नाईक यांचे विधान

Goa Politics: श्रीपाद नाईक : भाजप कार्यकाळात देशाचा सर्वांगीण विकास

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

काँग्रेसच्या 70 वर्षांच्या राजवटीत फक्त भ्रष्टाचार व घोटाळेच बाहेर पडले. मात्र, मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून खऱ्या अर्थाने देशाचा समृद्ध विकास झाला, असे प्रतिपादन उत्तर गोवा भाजप उमेदवार तथा विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांनी केले.

थिवी मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी शुक्रवारी (ता.२९) श्रीपाद नाईक यांनी कोलवाळ येथील पारंपरिक वाळूचा व्यवसाय करणाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री नीळकंठ हळर्णकर, विश्वनाथ खलप व इतर पदाधिकारी हे उपस्थित होते.

श्रीपाद नाईक म्हणाले की, सध्या विरोधकांकडे बोलण्यासाठी मुद्देच नाहीत. मोदी सरकारने जाचक ब्रिटीशकालीन कायदे हटवून नवीन सुटसुटीत कायदे आणले तसेच महामार्गाचे रुंदीकरण, पुलांच्या बांधणीच्या माध्यमातून देशाचा विकास घडविला.

काँग्रेस नेत्यांनी फक्त स्वतःचा विचार केला, त्याउलट भाजपने सामान्यांसह देशाचा आधी विचार केला मागील पंचवीस वर्षे उत्तर गोवा मतदारसंघाचे आपणास प्रतिनिधित्व करण्यास मिळाले. या कार्यकाळात आपण जवळपास 1200 प्रकल्प राबविले. तर चालू कार्यकाळात 91 कम्युनिटी हॉल, 72 स्मशानभूमी तसेच शाळांच्या इमारतींच्या बांधकामासह शालेय विद्यार्थ्यांना बसगाड्या, रुग्णवाहिका व इस्पितळासाठी खासदार निधीतून अर्थसाहाय्य पुरविले. त्याशिवाय पेडणे तालुक्यात आयुर्वेदिक इस्पितळ उभारले.

थिवीतून भाऊंना मताधिक्य मिळेल

मंत्री नीळकंठ हळर्णकर म्हणाले की, भाजप सरकारने सेवा व सुशासन दिले. अंत्योदय तत्त्वावर सामान्यांसाठी योजना राबविल्या आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत थिवी मतदारसंघातून श्रीपाद नाईक यांना किमान ६ ते ७ हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास आहे.

पल्लवी धेंपेंचा 3 एप्रिलला काणकोण दाैरा

भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांचा ३ एप्रिल रोजी काणकोण दाैरा असेल. त्या भाजप बुथ समिती व अन्य प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने संपूर्ण मतदारसंघातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना त्या भेटतील. मतदारसंघातील ३ ठिकाणी बैठकीचे आयोजन केले आहे. शुक्रवारी चावडी येथील सभापती तवडकर यांच्या कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. यावेळी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढील काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येईल. भाजप व मोदी सरकारमुळेच सध्या जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मोदी सरकारने आतापर्यंत २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेखालून बाहेर काढले. भाजपने मागील दहा वर्षांत देशवासीयांना आत्मनिर्भर बनवले.
- श्रीपाद नाईक, उत्तर गोवा भाजप उमेदवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco ATM Scam: एटीएममध्ये पैसे भरणारेच निघाले चोर! खासगी कंपनीच्या 5 कर्मचाऱ्यांनी लंपास केले 14 लाख; वास्कोतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

SCROLL FOR NEXT