Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांची पावले गोव्याकडे; किनाऱ्यांवर गर्दी

Goa Tourism: ‘विकेंड’मुळे गोव्याला पसंती : आठवडाभर पर्यटनस्थळे जाम पॅक
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism:

सलग सुट्यांमुळे देशी पर्यटकांनी गोव्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. गेला आठवडाभर पर्यटकांनी राज्य गजबजलेले असून त्यात आजपासून आणखीन पर्यटकांची भर पडली आहे. विदेशी पर्यटकांची संख्या मात्र रोडावलेली आहे.

मागील शनिवार रविवारला जोडून सोमवारी होळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी होती. त्यानंतर शिमगोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी मंगळवारी स्थानिक सुट्टी देण्यात आली होती. आज गुडफ्रायडेची सुट्टी आहे. त्यामुळे बुधवार व गुरुवार अशा दोन दिवस रजा घेतल्या की आठवडाभरापेक्षा जास्त सुट्टी उपभोगता येत असल्याने बऱ्याच पर्यटकांनी या सुट्टीचा वापर केला.

Goa Tourism
Goa Accident Death: कारच्या धडकेने जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू

संकेतस्थळावर वाढले बुकींग: मेक माय ट्रीप या प्रवासाचे नियोजन करणाऱ्या संकेतस्थळावरही या मोठ्या सुट्टीत देशी पर्यटकांनी गोव्याला पसंती दिल्याचे म्हटले आहे. मध्यंतरी गोव्याला पुरी, वाराणशीने पर्यटक संख्येच्या बाबतीत मागे टाकले होते.

या आठवड्यात मात्र पर्यटकांची विशेष पसंती पुरी वाराणशीला नसल्याचे या संकेतस्थळावरील माहितीवर नजर मारल्यावर दिसते. त्यानुसार गोव्याखालोखाल श्रीनगर, गुवाहाटी, पोर्टब्लेअर, बागडोगरा, उदयपूर, जयपूर, पूरी आणि वाराणशी यांना अनुक्रमे देशी पर्यटकांची पसंती आहे. क्लिअरट्रीप या संकेतस्थळाने पर्यटकांची गोव्याला पहिली पसंती असल्याचे म्हटले आहे.

पर्यटकांची गोव्याला वाढती पसंती हे राज्यातील पर्यटन व्यावसायिकांसाठी सुचिन्ह आहे. शाळांना सुटी पडल्यानंतर पालक मुलांसोबत सुट्टीवर दरवर्षी गोव्यात येतात. त्यामुळे शाळा सुरु होईपर्यंत पर्यटकांची चांगलीच वर्दळ गोव्यात असेल. सध्याही सलग सुट्टीमुळे वर्दळ आहे. पुढील महिन्यातही गुढी पाडवा आणि राम नवमीच्या सुट्टीच्या आसपास पर्यटकांची संख्या वाढलेली असेल.

नीलेश शाह, अध्यक्ष टीटीएजी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com