Shripad Naik; Goa
Shripad Naik; Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: श्रीपाद नाईक राज्याच्या राजकारणात परतणार

दैनिक गोमन्तक

पणजी: अलीकडेच खाते बदल झालेले केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना राज्याच्या राजकारणात परत पाठवण्याविषयी भाजपने वरिष्ठ पातळीवर विचार सुरू केला आहे. नाईक यांच्यासाठी कुंभारजुवे मतदारसंघ सुरक्षित असल्याचे पक्षांतर्गत सर्वेक्षणातून समोर आल्यानंतर या विचाराला गती मिळाली आहे. (Shripad Naik will return to state politics)

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर यांनी नाईक यांच्या राज्यातील राजकारणात परतण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे ट्विट करून भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या खदखदीला तोंड फोडले आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की आम्ही सहृदयतेने नाईक यांनी राज्यातील राजकारणात परतण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. मी गोमंतकीय नेत्यांच्या वतीने सांगू इच्छितो की, त्यांचा हा निर्णय उपयुक्त ठरेल. मी नेहमीच त्यांच्याकडे मार्गदर्शक या नात्याने पाहिले आहे.

ट्विटमध्ये म्हटलेले आम्ही कोण, यावरूनही आता मोठी चर्चा जोर धरू लागली आहे. भाजप परिवाराशी नाईक यांचे पूर्वापार असलेले संबंध आणि त्यांच्या मृदू स्वभावामुळे जोडली गेलेली जनता याचा फायदा पक्षाला होणार, असा भाजपच्याच काही नेत्यांचा होरा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1989 मध्ये भाजपचे काम करण्यासाठी दिलेल्या तीन स्वयंसेवकांत नाईक यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

पेरु देशाचा मोठा निर्णय! ट्रान्स लोकांना केले 'मानसिक रुग्ण' घोषित; सरकार देणार मोफत उपचार

SCROLL FOR NEXT