Goa Vaccination: विदेशी नागरिक ठरू शकतात ‘सुपर स्प्रेडर’

भारतात आणि गोवा (Goa) राज्यात परदेशांतून आलेल्या व्यक्तींकडूनच कोरोना पसरलेला आहे.
Goa vaccination
Goa vaccinationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : भारतात आणि गोवा राज्यात परदेशांतून आलेल्या व्यक्तींकडूनच कोरोना पसरलेला आहे. असे असताना सध्या राज्यात असलेल्या किंवा अडकून पडलेल्या हजारो विदेशी नागरिकांना लस घेण्याची परवानगीच दिलेली नाही. याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही मार्गदर्शक सूचना आलेली नाही. त्यामुळे त्यांना लसीकरण करण्यात येत नाही, अशी माहिती आरोग्य खात्याच्या लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली. (Foreign nationals are not allowed to be vaccinated in Goa)

कोरोनाचा एक सुपर स्प्रेडर रुग्ण 300 लोकांना बाधित करतो, हा अनुभव असल्याने या विदेशी नागरिकांकडून ही स्थानिक नागरिकांना कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे त्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या तरी कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. राज्य सरकारने यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू केले असून 15 जुलैपर्यंत राज्यातील 9 लाख 43 हजार 155नागरिकांचे लसीकरण केले आहे. यापैकी 79 टक्के म्हणजे सात लाख 49 हजार 185 नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोस दिला आहे.

Goa vaccination
Goa: कासारवर्णेत लसीकरणावेळी नियमांचा फज्जा

विकत का होईना, मला लस द्या - ऍना ऱ्होम

मला कोविड प्रतिबंधक लस घ्यायची आहे. ती विकत मिळाली तरीही चालेल. पण लस लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी इस्रालयची नागरिक असलेल्या आणि सध्या पाळोळे येथे राहणाऱ्या ऍना ऱ्होम यांनी केली आहे.

8,200 विदेशींनी भरला सी फॉर्म

गोवा पोलीस दलाच्या परदेशी नागरिक नोंदणी विभागातील माहितीनुसार, राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल आठ हजार 200 विदेशी नागरिकांनी सी फॉर्म भरला आहे. तर एक हजार 270 विदेशी नागरिकांनी सी फॉर्म रजिस्टर केला आहे.

...म्हणून नेपाळी नागरिकांना लस

केवळ भारत आणि नेपाळ यांच्यातील आंतरराष्ट्रीय करारानुसार नेपाळी लोक आपल्या देशाचे नागरिक आहेत, असे मानले जातात. त्यामुळे केवळ नेपाळी नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.

अनिल पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com