लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छूक नाही. तसे असते तर मी विधानसभा लढवली असती. मी प्रदेशाध्यक्ष असून, मी माझ्या पदाला न्याय देत आहे. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीसंदर्भात पक्षच अंतिम निर्णय घेईल. याबाबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी वक्तव्य करणे चुकीचे आहे. अस मत भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केले आहे.
सदानंद तानावडे (Sadanand Tanawade) यांनी पत्रकारांना सांगितले की, तिकिटासाठी कोणीही त्यांच्याशी संपर्क साधला नाही, अजून दोन वर्षे बाकी आहेत. आपण स्वतः तिकिटासाठी इच्छुक आहात का, असे विचारले असता ते म्हणाले की, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असून या पदाला न्याय द्यायचा आहे. "मला लोकसभा निवडणूक (elections) लढवण्यात रस नाही.
राज्य सरकार (State Government) राज्यात धर्मांतर करू देणार नाही या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विधानावर तसेच गोव्यात व्याघ्र प्रकल्प होऊ देणार नाही या वनमंत्री विश्वजित राणे यांच्या वक्तव्यावरही तानवडे यांनी भाष्य करण्याचे टाळले.
श्रीपाद नाईक (Shripad Naik) म्हणाले की ते संसदीय निवडणुका लढण्यास तयार आहेत. मी आरोग्याच्या कारणास्तव निवडणूक लढवणार नाही असे काही अनुमान आहेत. हे खरे नाही. आरोग्याच्या दृष्टीने, मी ठीक असल्याचं स्पष्टीकरण नाईक यांनी यावेळी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.