Shripad Naik may be made a minister again in Modi government Dainik Gomantak
गोवा

Shripad Naik: श्रीपाद भाऊंच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? उत्तर गोव्यातून बाजी मारताच चर्चांना उधाण

New Modi Government: भाजपचे श्रीपाद नाईक यांना केंद्रात भाजपने सत्ता स्थापन केल्यास केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

New Modi Government: लोकसभेच्या उत्तर गोवा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून येऊन संसदेत जाणारे भाजपचे श्रीपाद नाईक यांना केंद्रात भाजपने सत्ता स्थापन केल्यास केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण नाईक यांची ही शेवटची निवडणूक असल्याने केंद्रीय मंत्रिपद त्यांच्याकडे आपोआप चालून येईल, असे स्पष्ट दिसते.

मागील निवडणुकीत निवडून आल्यानंतर भाजप सरकारात ते केंद्रीय राज्यमंत्री राहिले. राज्यमंत्री म्हणून आयुष खाते, पर्यटन खाते त्यांनी सांभाळल्याने त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी नक्कीच आहे.

जर भाजप केंद्रात सरकार स्थापन करू शकला, तर श्रीपाद नाईक यांना मंत्रिपद द्यावेच लागणार आहे, ज्येष्ठ आणि सर्वात जास्तवेळा लोकसभेत निवडून येणारे सध्याचे ते एक खासदार असणार आहेत. त्यामुळे त्यांची निश्‍चित संभाव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान असेल, असे गोव्यातील भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही वाटत आहे.

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे जरी नाईक सांगत असले, तरी केंद्रात मंत्री होण्याची इच्छा ते उघडपणे बोलू शकत नाहीत, हे स्पष्ट आहे. मागील दोन टर्म भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले, पण आता यावेळेस भाजपने सत्ता स्थापन केलीच, तर उत्तर गोव्यासाठी नाईक यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची आशा नक्कीच त्यांच्या समर्थकांना असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: "माझे घर" योजना सप्टेंबरपासून लागू - मुख्यमंत्री

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT