Goa Loksabha Election 2024 | Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: श्रीपादनी ओळखली काळाची पावले!

Goa Politics: निवृत्तीचे संकेत : 2029 साली भाजपने युवा चेहऱ्याला संधी देण्‍याची सूचना

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

म्हापसा मुळात निवडणुकीत वयाचा मुद्दा येत नाही. पण 2029 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरेतून कुणी इच्छा व्‍यक्त केल्‍यास भाजपने नवीन, युवा चेहऱ्याला अवश्य संधी द्यावी. तसे मी पक्षाला आज जाहीरपणे सांगत आहे, असे केंद्रीय मंत्री तथा उत्तरेतील भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान, त्‍यांच्‍या या विधानामुळे ही त्‍यांची शेवटची निवडणूक असेल हे स्‍पष्‍ट झाले आहे.

मागील कित्‍येक वर्षे तुम्ही खासदार आहात, असे विचारले असता श्रीपाद नाईक यांनी वरील प्रतिक्रिया दिली. आज मंगळवारी म्हापशातील उत्तर गोवा भाजप कार्यालयात ‘विकसित भारत’ या संकल्प यात्रा अभियानावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजप प्रदेशाध्‍यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, उपसभापती जोशुआ डिसोझा, म्हापसा नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर, आमदार मायकल लोबो, आमदार केदार नाईक, माजी आमदार दयानंद सोपटे, दत्ता खोलकर, महानंद अस्नोडकर उपस्थित होते.

या लोकसभेसाठी तुम्हाला तिकीट मिळणार याची खात्री होती का, असे विचारले असता नाईक म्हणाले की, पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा एकमेव ध्येय घेऊनच भाजप कार्यकर्ता म्‍हणून मी काम करत असतो.

त्यामुळे तिकीट मिळणार की नाही, हा मुद्दाच नसतो. कारण उमेदवार निवडीचा विषय हा पूर्णतः विचारअंती पक्षश्रेष्‍ठी घेतात. मुळात भाजप कार्यकर्त्यांचे एकच मिशन आहे आणि ते म्‍हणजे ‘विकसित भारत’. त्यामुळे सत्तेत असो किंवा नसो, पक्षाचे कार्य करत राहणार, असे ते म्हणाले.

दक्षिण गोव्यातील उमेदवार निवडीबाबत प्रदेशाध्‍यक्ष तानावडे यांना प्रश्‍‍न केला असता ते म्‍हणाले की, लोकसभा तसेच राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण मंजूर झाले आहे. त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसली तरी अधिकतर महिला कार्यकर्त्यांना संधी मिळावी हाच पक्षाचा प्रामाणिक उद्देश आहे.

त्यानुसार केंद्राने किमान एक उमेदवार महिला असावी अशी सूचना केली आहे. त्यानुसार पक्ष अंतिम निर्णय घेईल. मुळात निवडणूक वैयक्तिक स्तरावर नसून पक्षाच्या ‘कमळ’ चिन्हावर आहे. त्यामुळे महिला किंवा पुरुष उमेदवार दक्षिणेतून उभा केल्यास भाजपचा विजय नक्की आहे.

जाहीरनामा असेल लोकाभिमुख

भाजप आपला जाहीरनामा लवकरच जाहीर करेल. या जाहिरनाम्यात लोकांची मते असावीत याच अनुषंगाने सर्व स्तरातील लोकांकडून सूचना मागविल्या जात आहेत, जेणेकरून तो लोकाभिमुख तयार करण्यास मदत होईल.

गोव्यातून किमान ५० हजार लोकांच्‍या सूचना मिळविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार, सर्वत्र भाजपचा संकल्प यात्रा रथ फिरवून त्यांच्याकडून सूचना मागवत असल्याचे सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले.

‘आरजी’वाल्‍यांना विकास दिसणारच नाही:

रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) हा काल-परवा आलेला पक्ष. त्यामुळे मागील २५ वर्षांत काय घडले आहे, हे आरजीवाल्यांना दिसणार नाही, असे श्रीपाद नाईक यांनी टीकेला प्रत्युत्तर देताना सांगितले.

‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांनी श्रीपाद नाईक यांच्‍यावर बोचरी टीका करताना, त्‍यांनी लोकांना फक्त हाय, हॅलो व बाय म्‍हणण्‍यापलीकडे कुठलाच विकास केलेला नाही असे म्‍हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

SCROLL FOR NEXT