Shri Lairai Temple Dainik Gomantak
गोवा

Shri Lairai Jatrotsav: 1 कोटींची आर्थिक उलाढाल अपेक्षित! लईराईच्या जत्रोत्सव तयारीला वेग, धोंड ‘तळ’ फुलले

Lairai Temple Shirgao: ‘मोगरी’ विक्रेत्यांपासून ते हॉटेल, मिठाई व्यावसायिकांचे लक्ष, उत्सुकता लागून राहिलेली शिरगाव येथील श्री लईराई देवीची जत्रा चार दिवसांवर आल्याने सर्वत्र मंगल वातावरण पसरले आहे.

Sameer Panditrao

डिचोली: ‘मोगरी’ विक्रेत्यांपासून ते हॉटेल, मिठाई व्यावसायिकांचे लक्ष आणि उत्सुकता लागून राहिलेली शिरगाव येथील श्री लईराई देवीची जत्रा चार दिवसांवर आल्याने सर्वत्र मंगल आणि भक्तिमय वातावरण पसरले आहे. सर्वत्र जत्रेच्या तयारीला वेग आला आहे.

शिरगावात स्टॉल थाटणे आदी तयारी अंतिम टप्प्यात आली असून, गावोगावी धोंड तळावर धोंड भक्तगणांच्या सोवळ्या व्रतास सुरुवात झाली आहे. संपूर्ण गोमंतकासह देश-विदेशात प्रसिद्धीस पावलेली आणि लाखो भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेली श्री लईराई देवीची जत्रा येत्या शुक्रवारी (ता.२ मे) परंपरेप्रमाणे साजरी होणार आहे.

तर दुसऱ्या दिवशी शनिवारपासून मंगळवारपर्यंत कौलोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, ‘होमकुंड’ हे शिरगावच्या जत्रेचे वैशिष्ट्य. ‘एक मोठे अग्निदिव्य’ अशी या ‘होमकुंडा’ची ख्याती आहे. जत्रा चार दिवसांवर आल्याने आता ‘होमकुंड’ रचण्याचे काम सुरू झाले आहे.

दरम्यान, खाणबंदीनंतर आणि वाढत्या महागाईचा या जत्रेच्या आर्थिक उलाढालीवर कोणताही परिणाम झाल्याचे जाणवत नाही. उलट दरवर्षी आर्थिक उलाढाल वाढत असते. सध्याच्या घडीस या जत्राकाळात होणारी आर्थिक उलाढाल एक कोटीच्या घरात पोहोचत आहे, अशी माहिती काही महाजनांकडून मिळाली.

लईराई देवीला ‘मोगरी’ची फुले प्रिय, अशी भक्तगणांची भावना आहे. त्यामुळे शिरगावात येणारा प्रत्येक भाविक देवीला मोगरीची फुले अर्पण करतात. जत्राकाळात शिरगावात ‘मोगरी’च्या फूल विक्रीतून जवळपास २० लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते, असा अंदाज आहे. वेगवेगळ्या भागातून मिळून जवळपास ५०० फूलविक्रेते ‘मोगरी’ची फुले विकण्यासाठी शिरगावात तळ ठोकतात.

स्टॉल थाटण्याचे काम जोरात

श्री लईराई देवीच्या जत्रेनिमित्त देवीच्या मंदिरापर्यंत शेकडो दुकानांची फेरी भरत असते. त्यात खाजे, खेळणी, रेडिमेड कपडे, हॉटेल्स आदी मिळून वेगवेगळ्या साहित्याची दुकाने असतात. दरवर्षीप्रमाणे पावणी करून दुकानांसाठी जागा वाटप करण्यात आले असून, दुकानदारांनी स्टॉल थाटण्यास सुरुवात केली आहे. सध्या स्टॉल थाटण्याचे काम जोरात सुरू आहे. जत्रा सुरळीतपणे साजरी व्हावी यासाठी देवस्थान समिती कामाला लागली आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

धोंड भक्तगणांची तयारी

जत्रेनिमित्त गावोगावी धोंड भक्तगण तयारीला लागले असून, धोंड तळही सज्ज झाले आहेत. गावोगावी असलेले देवीचे धोंड जत्रेपूर्वी किमान पाच दिवस कडक आणि सोवळे व्रत पाळतात. हे धोंड भक्तगण नदीकाठी किंवा धार्मिक स्थळी धोंड तळावर एकत्रितपणे वास्तव्य करून व्रत पाळतात.

सोमवारपासून धोंड भक्तगणांच्या कडक व्रताला प्रारंभ झाला आहे. नवीन धोंड भक्तगण पाच दिवस, तर जुने धोंड भक्तगण तीन दिवस कडक व्रत पाळतात. सध्या धोंड तळावर प्रसन्न वातावरण असून, श्री लईराई देवीचा जयघोष कानी पडत आहे. जत्रेच्या आदल्या रात्री गुरुवारी प्रत्येक ‘धोंड’ तळावर ‘व्हडले’ जेवण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT