Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : श्रेया ‘धारगळकर’ नाहीत; जामिनाचा अर्ज फेटाळला

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, लईराई धोंड भक्तगणांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ''श्रेया''च्या अडचणी आता वाढल्या आहेत.

पूर्वाश्रमीच्या फातिमा व्ही. के. असलेल्या श्रेया हिचा धारगळकर नामक व्यक्तीशी घटस्फोट झाल्याने ती आता ''धारगळकर'' हे आडनाव वापरू शकत नाही. असा मुद्दा ''श्रेया''च्या जामीन अर्जावरील आजच्या सुनावणीवेळी फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.

‘श्रेया’चे पूर्वाश्रमीचे नाव फातिमा व्ही. के.

श्रेया हिचे पूर्वाश्रमीचे नाव फातिमा व्ही. के. असे आहे. नंतर तिने धारगळकर आडनाव असलेल्या व्यक्तीशी लग्न केले. २०२१ साली तिने धारगळकर यांच्याशी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सहा महिन्यापर्यंत श्रेया धारगळकर हे नाव वापरणार असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले होते. त्यामुळे सध्या ती श्रेया धारगळकर या नावाचा वापर करू शकत नाही. हा मुद्दा न्यायालयाला पटवून दिल्याने न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

- ॲड. पुष्पराज न्हावेलकर, वकील.

श्रेया आता ‘धारगळकर’ नाहीत

श्रेयाच्या जामीन अर्जावर सुनावणीवेळी श्रेयाबाबतीत वेगळीच माहिती पुढे आली. श्रेया हिने पूर्वाश्रमीच्या धारगळकर नामक नवऱ्याशी २०२१ घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे ती श्रेया धारगळकर या नावाचा वापर करून जामिनासाठी अर्ज करू शकत नाही.

हा मुद्दा फिर्यादी पक्षातर्फे युक्तिवाद मांडताना ॲड. पुष्पराज न्हावेलकर यांनी पुराव्यासह न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. तर श्रेया हिला जामीन दिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सध्या आचारसंहिता लागू आहे. असा मुद्दा सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादात उपस्थित केला. युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश अक्षता काळे यांनी श्रेया हिने दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT