Shreya Dhargalkar Video Dainik Gomantak
गोवा

Goa Video: 'सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही', तुरुंगात टाकल्याबद्दल श्रेया मुख्यमंत्र्यांना म्हणाली I Love You

Shreya Dhargalkar Video: शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थान आणि लईराई देवीच्या धोंडांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी श्रेया धारगळकर अडचणीत सापडली होती.

Pramod Yadav

Shreya Dhargalkar Video

फातार्पा येथील शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थान आणि लईराई देवीच्या धोंडांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी श्रेया धारगळकर अटकेत होती.

कुंकळ्ळी पोलिसांच्या अटकेतून बाहेर पडल्यानंतर डिचोली पोलिसांनी तिला अटक केली. सुरुवातीला जामीन याचिका फेटाळल्यानंतर अखेर तिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. पण, कोलवाळमधून बाहेर येताच श्रेयाने मुख्यमंत्र्यांवर निशाना साधत तुरुंगात टाकल्याबद्दल त्यांना I Love You म्हणाली.

"ज्या कोणी मला तुरुंगात पाठवले त्यांना मी धन्यवाद देते, कारण मी खूप स्ट्राँग होऊन बाहेर पडलीय. मी तुरुंगात महिलांचे दु:ख पाहिले. आणि आता मला तुरुंगातील कैद्यांच्या हक्कासाठी लढाई करायची आहे."

"मी एवढे काही मोठे केले नसताना मला तुरुंगात पाठवले त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना I Love You म्हणते. कोरोना काळात एवढे काम केले, माझे घर विकले पण मला कोरोनाचे एक प्रमाणपत्र कधी दिले नाही. पण मला तुरुंगात पाठवले त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देते, देव सर्वकाही पाहतोय."

"माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून त्यांची माफी मागते. कोणीच कोणाचे मन दुखवू नये या मताची मी आहे," असेही श्रेया धारगळकर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर म्हणाली.

"ज्यापद्धतीने मला अटक करण्यात आली, लोक माझ्यावर धावून आले, त्यामुळे मी माझे आयुष्य धोक्यात असल्याचे म्हणाली," अशी कबुली तिने बाहेर पडल्यानंतर दिली.

"श्रेयाने यावेळी गोवा पोलिसांना आवाहन करताना खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकू नका, असे म्हटले. योग्य तपास केल्यानंतरच त्यांना अटक किंवा तुरुंगात टाका. मी येथे राहुन अनेक गोष्टी शिकले," असेही श्रेया म्हणाली.

जामीनावर बाहेर आलेली श्रेया काय म्हणाली पहा व्हिडिओ!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT