Shravan Barve case update Dainik Gomantak
गोवा

Shravan Barve Murder: श्रवण बर्वे खून प्रकरण! सख्या भावाला जमीन मंजूर; अडीच महिन्यानंतरही ठोस पुरावा नाही

Uday Barve Bail: अडीच महिने उलटूनही तपासानंतर पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे हाती लागले नाहीत आणि म्हणून उदय देविदास बर्वे याला जामीन मंजूर करण्यात आला

Akshata Chhatre

वाळपई: सत्तरी तालुक्यातील नगरगाव-आंबेडे येथे १५ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या २४ वर्षीय श्रवण देविदास बर्वे या युवकाच्या खून प्रकरणात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. तब्बल अडीच महिने उलटूनही तपासानंतर पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे हाती लागले नाहीत आणि म्हणून उदय देविदास बर्वे याला जामीन मंजूर करण्यात आलाय.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश क्षमा जोशी यांनी संशयित उदयला सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयाने उदयकडून २५,००० रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र घेऊन हा जामीन दिला आहे.

त्याला पुढील १० दिवस सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहावे लागणार आहे. तसेच, साक्षीदारांशी संपर्क न ठेवणे किंवा धमकी न देणे, तपास अधिकारी आणि न्यायालयात आवश्यकतेनुसार उपस्थित राहणे, आरोपपत्र दाखल होईपर्यंत गोवा किंवा भारताबाहेर न जाणे आणि यासाठी लेखी परवानगी घेणे, स्वतःचा मोबाईल क्रमांक तपास अधिकाऱ्यास देणे, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर प्रत्येक सुनावणीस उपस्थित राहणे आणि तपासात पूर्ण सहकार्य करणे, अशा अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी श्रवण बर्वे खून प्रकरण घडले होते, तेव्हा वडिलांनीच स्वतःच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची चर्चा होती, ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त झाली होती. २४ वर्षीय श्रवणचा मृतदेह घराजवळ सापडल्यानंतर गोवा पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी सुरू केली होती.

तत्कालीन उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी २० एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, संशयित आरोपी वासुदेव ओझरेकर याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृतक श्रवण बर्वेच्या वडिलांनी (देविदास बर्वे) आणि भावाने (उदय बर्वे) त्याच्या मदतीने १३ एप्रिल रोजी स्वतःच्या मुलाच्या मृत्यूचा कट रचला होता.

वाळपई येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, श्रवण बर्वे खून प्रकरणी संशयित आरोपी वासुदेव ओझरेकर, देविदास बर्वे आणि उदय बर्वे यांना यापूर्वी न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. आता उदयला जामीन मिळाल्याने, या प्रकरणाच्या तपासाची दिशा आणि अंतिम निकाल काय लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण या खुनाच्या कटामागील नेमके सत्य अजूनही समोर आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'मी अशा पुरुषाच्या शोधात’; ऑनलाईन अश्लील जाहिरातीला बळी पडला अन् लाखो रुपये गमावले

Tallest Ram statue in Goa India: गोव्यात उभारला जातोय देशातील सर्वात उंच श्रीरामाचा पुतळा; 28 नोव्हेंबरला PM मोदी करणार अनावरण

World Cup 2025 Final: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल सामना? Live मोफत कुठे पाहता येणार?

बॉलिवूडची 'श्री'कन्या, साऊथची 'अचियम्मा'! जान्हवी कपूरच्या 'Achiyyamma' लूकची हवा; राम चरणसोबत गाजवणार दक्षिणी सिनेमा

Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

SCROLL FOR NEXT