
सत्तरी: वडील आणि आणि सख्या भावावरच खुनाचा आरोप असलेल्या श्रवण बर्वे खून प्रकरणाचा उलघड अजून झालेला नाही. वाळपई येथील या खून प्रकरणात वाळपईतील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्रवण बर्वे खून प्रकरणी संशयित आरोपी वासुदेव ओझरेकर, देविदास बर्वे आणि उदय बर्वे यांना पुन्हा एकदा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलीये.
२४ वर्षीय श्रवण बर्वेच्या मृत्यू प्रकरणी यापूर्वी देखील वाळपईतील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी संशयित आरोपींना ८ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सध्या वाळपई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत, त्यामुळे याबद्दल आणखीन माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
साधारण महिन्याभरापूर्वी श्रवण बर्वे खून प्रकरण घडलं. वडिलांनीच स्वतःच्या मुलाच्या केलेल्या निर्घृण हत्येमुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात होती. २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह घराजवळ सापडताच गोवा पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी करायला सुरूवात केली होती.
यानुसार सर्वात आधी आंबेडे येथील संशयित आरोपी वासुदेव ओझरेकर याला अटक करण्यात आली होती, वासुदेवनेच पोलीस चौकशी दरम्यान देविदास बर्वे आणि उदय बर्वे यांची नावं उघड केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला.
तत्कालीन उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी रविवारी (दि.२०) रोजी पत्रकार परिषदेत तपासाचे काही तपशील उघड केले होते. संशयीत आरोपी वासुदेव ओझरेकर याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मयत श्रवण बर्वे याच्या वडिलांनीच त्याच्या मदतीने १३ एप्रिल रोजी स्वतःच्या मुलाच्या मृत्यूचा कट रचला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.