दुभत्या म्हशींवर झाडल्या गोळ्या  Dainik Gomantak
गोवा

संतापजनक: दुभत्या म्हशींवर झाडल्या गोळ्या

खाण्यासाठी फार्ममध्ये घुसलेल्या चार दुभत्या म्हशींवर गोळ्या झाडण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

दैनिक गोमन्तक

सांगे : माणसातील संवेदना हरविली की काय, असा प्रश्न उगेतील घटनेने उपस्थित झालाय. चारा खाण्यासाठी फार्ममध्ये घुसलेल्या चार दुभत्या म्हशींवर (buffalo) गोळ्या झाडण्यात (Shots fired) आल्याचा संशय व्यक्त होत आहे. तीन म्हशी जागीच ठार झाल्या. एक जखमी अवस्थेत बागायतीत सापडली. ही घटना शुक्रवारी (ता. 6) रात्री घडली. या घटनेने शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली याची सांगे पोलिसांनी कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशी क्रूर घटना सांगे भागात प्रथमच घडली. ज्याच्या या म्हशीं होत्या त्या शेतकऱ्याने कर्ज काढून घेतल्या होत्या. (Shots fired on buffaloes in goa)

म्हशींना गोळ्या घालून बागायतीतच ठार मारल्याची तक्रार वालंकिणी सांगे येथील जानू यमकर यांनी केली. तीन दुभत्या म्हशी बोबडं उगे येथील बाबू नाईक यांच्या फार्ममध्ये आढळल्या तर एक म्हैस जखमी अवस्थेत सापडली.

कर्ज काढून घेतल्या होत्या म्हशी

जानू यमकर या गरीब शेतकऱ्याने कर्ज काढून चार म्हैशी घेतल्या होत्या. त्याची आर्थिक स्थितीही नाजूक आहे. हा शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. त्याला सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे, स्थानिक पंच माया जांगळे यानी या घटनेची सांगे पोलिसांनी कसून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दुभत्या म्हशींना गोळ्या घालून मारण्यात आले असा समज पसरला असला तरी या मृत म्हशींची शवचिकित्सा केली असता त्यांच्या शरीरात गोळ्या सापडल्या नाहीत. त्या म्हशींच्या मालकानेही कुणावर थेट संशय व्यक्त केलेला नाही. त्यामुळे कुणालाही अटक केलेली नाही.

- सचिन पन्हाळकर, सांगे पोलिस निरीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

School Bus Accident: 25 शाळकरी मुलांवर काळाचा घाला! स्कूल बस नदीत कोसळल्याने हाहाकार; पालकांची धावपळ

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

SCROLL FOR NEXT