Goa GMC  Dainik Gomantak
गोवा

Goa GMC: गोमेकॉत कृत्रिम अवयवांची कमतरता

Goa GMC: नीलेश काब्राल यांची टीका : आमदारांकडून पुरवणी मागण्यांची मांडणी

दैनिक गोमन्तक

Goa GMC: सोमवारी जेवणाच्या सुट्टीनंतर कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी गोमेकॉत शरीराच्या अवयवांच्या अनुपलब्धतेशी संबंधित एक मुद्दा पुढे केला. काब्राल म्हणाले की, 78 वर्षांच्या कुडचडे येथील एका महिलेचे पायाचे हाड फ्रॅक्चर झाले होते; पण तिच्यावर कृत्रिम अवयवाचे रोपण करणे गोमेकॉत शक्य झाले नाही.

त्या महिलेला बाहेरील बाजारातील कृत्रिम अवयव विकत घेऊन रोपण करावे लागले; कारण गोमेकॉत ते अनुपलब्ध होते. यासंदर्भात त्यांनी आरोग्यमंत्र्यांना जाब विचारला. त्यानंतर शुक्रवारी याविषयावर उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया राणे यांनी दिली.

सन 2023-24 या वर्षासाठीच्या अनेक पुरवणी मागण्या सोमवारी विधानसभेच्या अधिवेशनासमोर ठेवण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांवर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सूचना केल्या.

त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विनियोग विधेयक 2023-24 मांडले. ज्याला विधानसभेच्या अधिवेशनात परवानगी मिळाली. भाडे नियंत्रण बिल मागे घेण्यात आले. पुढे गोवा नगर नियोजन सुधारणा विधेयक,

गोवा मोटार कर सुधारणा विधेयक, गोवा जमीन वापर दुरुस्ती विधेयक, गोवा वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, गोवा मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक, इमारत भाडेपट्टी आणि निष्कासन विधेयक इ. विधानसभा अधिवेशनामध्ये सादर करण्याची परवानगी मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT