Chief Minister of Goa, Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: बांबोळीतील गाडेधारकांना दुकाने देणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

दैनिक गोमन्तक

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयासमोरील (Goa Medical College) गाडे रुग्णवाहिका व इतर वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या कारणामुळे गुरुवारी हटविले होते. मात्र, स्थानिक आमदारांचा दबाव व जवळ आलेल्या निवडणुका यामुळे सरकारने या गाडेधारकांचे पुर्नवसन करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी गाडेधारकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला, अशी माहिती आमदार टोनी फर्नांडिस यांनी दिली. (Shops will be given to Stall owners in Bambolim)

परवा गाडे हटविल्यानंतर आज पहाटे सर्व गाडेचालक बांबोळी येथे जमले. काही फळ विक्रेत्या महिला पूर्वीच्या जागी बसण्यास गेल्या असता पोलिसांनी त्यांना अटकाव केला. लोक मोठ्या संख्येने जमा होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस तेथे पोचले. गाडेचालक आक्रमक झाले व आम्हालाही उचलून न्या म्हणू लागले.

सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस, सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्यासह कुडका बांबोळी पंचायत तसेच जवळच्या पंचायतींचे सरपंच व पंच तेथे दाखल झाले. शेवटी आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून फळे विक्रेत्यांना बसण्यास जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे काही विक्रेत्या तेथे बसल्याही. मात्र, गाडेचालकांनी आमदारांना आपला प्रश्‍न सोडवण्याची गळ घातली असता दोन्ही आमदार व सरपंच, पंच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोचले व तेथे त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली.

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना स्थानिकांना दुखवून चालणार नाही, असे टोनी फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्याना पटवून दिले. शेवटी फुले व फळे विक्रत्यांसह एकूण 45 गाडेचालकांना गोमेकॉच्या बाजूच्या जागेत गाळे बांधून त्यांचे पुर्नवसन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले व तशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली, अशी माहिती बैठकीनंतर आमदार टोनी फर्नांडिस यांनी दिली.

न्यायालयाच्या आदेशामुळे गाडे हटवावे लागले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी योग्य तो तोडगा काढला आहे. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. गाडेचालकांना गाळे मिळणार आहेत. असेही आमदार फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT