Shops demolishing by crane, at Mapusa (Goa) on Tuesday, 20 July, 2021. Santosh Govekar
गोवा

Goa: म्‍हापशात सात दुकाने जमीनदोस्‍त

म्‍हापसा-कळंगुट रस्‍त्‍यावर( on mapusa-calangute road) बेकायदा उभारणी (Shops Demolished)

Santosh Kubal

शिवोली : वेर्ला-काणका पंचायत (verla canca panchayat area) क्षेत्रातील म्हापसा ते कळंगुट मुख्य रस्त्याच्या (main road) दुतर्फा बेकायदा उभारण्‍यात आलेली सात दुकाने आज मंगळवारी जमीनदोस्‍त करण्‍यात आली (Shops Demolished). ही दुकाने दाटीवाटीने परप्रांतीय तसेच स्थानिक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी (small buisenesmen) थाटली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार (High court order) आज सकाळी कडक पोलिस बंदोबस्‍तात (With help of Police) ती पाडण्‍यात आली. एकूण दहा दुकानांवर (total ten shops) कारवाई (action) करण्‍याचा आदेश देण्‍यात आला होता. मात्र, तीन दुकानमालकांनी न्यायालयाकडून स्टे-ऑर्डर (stay order) आणल्याने त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

Goa: कोविड (covid) महामारीमुळे गेल्या वर्षी २५ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने बराचकाळ म्हापसा येथील मुख्य बाजारपेठ (mapusa main market) स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडून (palika administration) बंद ठेवण्यात आली होती. याच संधीचा फायदा घेत स्थानिक तसेच परप्रांतीय व्यापाऱ्यांनी म्हापसा शहरापासून तीन किलोमीटरच्या अंतरापर्यंत दाटीवाटीने बेकायदा दुकाने थाटली होती. मात्र यामुळे म्हापशाहून कळंगुटकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होत होता, वाहतुकीची प्रचंड कोंडी (traffic jam) होत होती. तसेच अपघातांच्या (accident) संख्येत बरीच वाढ झाली होती. वेळोवेळी सूचना करूनसुद्धा संबंधित दुकानमालकांकडून याबाबतीत पंचायतीच्या आदेशाकडे कानाडोळा केला जात होता. शेवटी या प्रकाराची गंभीर दखल घेत वेर्ला-काणका ग्रामपंचायत तसेच गोवा फाऊंडेशन या संस्थेने न्‍यायालयात धाव घेऊन ही बेकायदा दुकाने त्वरित हटवण्याची मागणी केली होती. त्‍यानुसार उच्च न्ययालयाकडून आलेल्या अंतरिम आदेशाची दखल घेत पंचायत मंडळाने विशेष पथकाद्वारे आज मंगळवारी (tuesday) सकाळी सात दुकाने भुईसपाट केली. यावेळी बंदोबस्तासाठी म्हापसा तसेच हणजूण येथील पोलिस फौजफाटा तैनात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

Actress Sandhya: ए मालिक तेरे बंदे हम! भारतीय चित्रपटसृष्टीच्या महान पर्वाच्या साक्षीदार 'संध्या'

Punav Utsav: देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात, मंगलाष्टके म्हणून ‘शिवलग्न’ लावले जाते; पेडणेची प्रसिद्ध 'पुनाव'

Goa Agriculture: 'थोडा अभ्यास वाढवला, सरकारने सहकार्य केले तर गोव्यात मुबलक भाजीपाला पिकेल'; कृषी राजदूत 'वरद'चे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT