Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: बापरे! मोपा ते बाणावली टॅक्सी भाडे तब्बल 4180 रूपये...

सोशल मीडियात रिसिट व्हायरल, एका विमान तिकीट दराएवढे टॅक्सी भाडे

Akshay Nirmale

Goa Taxi: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्लाईटमधून उतरलेल्या एका प्रवाशाला मोपा ते बाणावली या टॅक्सी प्रवासासाठी तब्बल 4180 रूपये भाडे द्यावे लागले. टॅक्सीचे हे भाडे हा आता चर्चेचा विषय झाला आहे. नेटीझन्सही यावरून टीका करत आहेत. जेवढे टॅक्सीभाडे या प्रवाशाला द्यावे लागले आहे तेवढ्यात विमान प्रवासाचे आणखी एक तिकीट खरेदी केले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.

रोहन गोवेकर असे या प्रवाशाचे नाव आहे. रोहन गोवेकर यांनी त्यांचे टॅक्सीच्या प्रवासी भाड्याची रिसीट सोशल मीडियात शेअर केली आहे. टॅक्सी भाड्याची ही रिसीट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. गोवेकर यांनी शेअर केलेल्या रिसीटमध्ये दिसते की मोपा ते बाणावली हे अंतर 65.86 किलोमीटर इतके आहे. यात टॅक्सीचे भाडे 3227.14 रूपये, सर्व्हिस फी 484.07 रूपये, एअरपोर्ट चार्जेस 160 रूपये आणि जीएसटी 161.36 आणि 115.93 रूपये असे मिळून 4148.50 रूपये बिल आले आहे. त्यावर नेटीझन्सकडून विमान तिकीटाचे दर जास्त की टॅक्सीभाडे जास्त असा सवाल केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: रोहन यांच्या BCCI फेरनियुक्तीस ‘खो’! संयुक्त सचिवपद राखणे अशक्य; जीसीए प्रतिनिधी नेमणूक मुदत हुकली

Arambol: जंगल भागात झाडांची कत्तल! हरमल ग्रामस्थ संतप्त; तक्रारीनंतर पंचायत मंडळाने केली पाहणी

Goa Politics: खरी कुजबुज; ...मडगावकर मतदान करणार नाहीत!

Goa Live Updates: प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

Bits Pilani: ऋषी नायरला ड्रग्स कुठून मिळाले? त्याच्या खोलीत कोण आले होते? 'बिट्स पिलानी'तील मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT