Sports Authority Of Goa: कार्यालयातील कागदपत्रे सोशल मीडीयातून शेअर झाल्यावरून कर्मचाऱ्यांना मेमो

गोवा फॉरवर्डने घोटाळा उघड केल्यानंतर स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ गोवाची कारवाई
Sports Authority Of Goa
Sports Authority Of GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Sports Authority Of Goa: गोवा फॉरवर्ड पक्षाने 17 वर्षांखालील महिलांच्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील घोटाळा उघडकीस आणल्यावर आता स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ गोवाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना मेमो काढला आहे. कार्यालयातील कागदपत्रे सोशल मीडियावर शेअर झाल्यावरून त्यात इशारा दिला आहे.

Sports Authority Of Goa
Mahadayi Water Dispute : म्हादईप्रश्नी कन्नड धनगर समाजाचाही गोव्याला पाठिंबा

गोव्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या 17 वर्षाखालील महिला फिफा जागतिक चषक 2022 स्पर्धेवेळी इव्हेंट मॅनेंजमेंटच्या नावाखाली गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागाकडून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार गोवा फॉरवर्डचे विकास भगत यांनी दक्षता खात्याकडे केली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून घोटाळ्यात गुंतलेल्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दक्षता खात्यानेही त्यांना कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर गोवा क्रीडा प्राधिकरण खडबडून जागे झाले असून आता कर्मचाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. त्यासाठीच कार्यालयातील खासगी कागदपत्रे सोशल मीडियात शेअर झाल्यावरून कर्मचाऱ्यांना मेमो काढल्याची माहिती आहे.

दरम्यान, 17 वर्षांखालील महिला फिफा जागतिक चषक स्पर्धेसाठी राजश्री क्रिएशन्स यांची इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून नियुक्ती केली होती. या इव्हेंट मॅनेजमेंटतर्फे काही न केलेल्या कामांची बिले सादर केल्याने त्याला प्राधिकरणाच्या माजी संचालकांनी संमती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे क्रीडामंत्र्यांनी त्यांची तेथून उचलबांगडी करून त्यांच्या जागी त्यांच्याच नातेवाईकाला या पदावर विराजमान केले.

Sports Authority Of Goa
Nagarjuna: अभिनेता नागार्जून यांच्या अवैध बांधकामाची मांद्रे पंचायतीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

निवृत्त अधिकारी रंगाराजू यांची कंत्राटी पद्धतीवर अधीक्षक अभियंता म्हणून नियुक्ती केली. हे पद भरण्यासाठी संमती नाही व रिक्त असलेले मुख्य अभियंता पद अजूनही भरलेले नाही. रंगाराजू यांनी जे कारनामे जलसंपदा खात्यामध्ये केले तेच करण्यासाठी त्यांना या प्राधिकरणात आणले आहे. या एकूण गैरव्यवहारात तसेच हेराफेरीमध्ये संबंधित मंत्र्यांपासून ते अनेक सरकारी अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप भगत यांनी केला.

इव्हेंट मॅनेटमेंटने केलेली कामे कमी दर्जाची असल्याने या बिलांना मंजुरी दिली नाही. गोवा फॉरवर्डने माहिती हक्कांतर्गत माहिती मागवली होती. प्राधिकरणाने इव्हेंट मॅनेटमेंटची माहिती वगळून इतर सर्व माहिती दिली. यावरून प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागाकडून इव्हेट मॅनेटमेंटच्या बिलामध्ये हेराफेरी करण्याचा प्रयत्न रंगराजू करत आहेत. मे. व्हाईझक्स सोल्युशन्स लि. कंपनीचे लोगोसाठीचे 35 लाखांचे बिल तपासणी वा शहानिशा न करता ते मंजूर केल्याची माहिती आहे, असे भगत यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com