Mapusa Crime News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime News: धक्कादायक! म्हापशात शिक्षकाकडून अनेक विद्यार्थिनींचा विनयभंग

शाळा व्यवस्थापनानेच दिली तक्रार; शिक्षक पोलिसांच्या ताब्यात, पॉस्कोसह बाल कायद्यांतर्गत गुन्हा नोंद

Akshay Nirmale

Mapusa Crime News: म्हापसा येथे एका शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात पॉस्को तसेच बाल कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा शिक्षक उच्च माध्यमिक शाळेत अध्यापनाचे काम करतो.

म्हापसाचे एसडीपीओ जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यातील संबंधित शाळेच्या व्यवस्थापनानेच या शिक्षकाबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. संबंधित शिक्षक विद्यार्थिनींकडे सतत पाहत असल्याच्या तक्रारी शाळा व्यवस्थापनाकडे आल्या होत्या.

संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनींकडे त्यांचा मोबाईल फोन नंबरही मागितला होता. तसेच हा शिक्षक विद्यार्थिनींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याच्याही तक्रारी विद्यार्थिनींनी केल्या होत्या. सातत्याने अशा पद्धतीचे वर्तन पाहून अनेकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रारी केल्या होत्या.

काही विद्यार्थिनींनी घडलेले प्रकार त्यांच्या पालकांच्या कानावर घातले होते. या सर्व तक्रारींची दखल घेत शाळा व्यवस्थापनाने संबंधित शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या शिक्षकाविरोधात पॉस्को या कायद्यासह बाल कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Floods: नेपाळच्या महापुरातून 21 भारतीयांची सुखरुप सुटका, परराष्ट्र मंत्रालयाकडून यादी जाहीर; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

RGP Goa: काँग्रेससोबत आघाडीसाठी 'आरजी'ची तयारी! अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती; 30 दिवसांत चर्चा पूर्ण करण्याची मागणी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

SCROLL FOR NEXT