Margao Railway Station Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway Police Assault: धक्कादायक! साध्या वेशातील पोलिसाला मारहाण; मडगाव रेल्वे स्थानकातील घटना

कोकण रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याच्या बोटाला दुखापत; हल्लेखोर मूळचा कर्नाटकचा

Akshay Nirmale

Konkan Railway Police Beaten at Margao: कोकण रेल्वे पोलिसांत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला गोव्यातील मडगाव येथे मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

मडगाव येथील कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात श्रीनिवास रेड्डी हे कार्यरत आहेत. रमेश लक्ष्मण नाईक (वय 39) याने रेड्डी यांना मारहाण केली. सध्या तो मांडोप येथे वास्तव्यास असून मूळचा कर्नाटकातील भटकल येथील आहे.

मारहाणीची ही घटना घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. रेड्डी हे साध्या वेशात मडगाव रेल्वे स्थानकात गस्त घालत होते. तेव्हा नाईक याचे रेड्डी यांच्याशी भांडण झाले. यात नाईक याने रेड्डी यांना मारहाण केली. त्यात रेड्डी यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.

पोलिसांनी नाईक याच्यावर गुन्हा दाखल केला असून सध्या त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३३२ नुसार कोकण रेल्वे पोलिसांनी संशयितावर कारवाई केली आहे.

पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विन्टन आरावजो या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT