Usgao Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: तंत्र - मंत्राच्या प्रथेतून 5 वर्षीय अमैराला संपवल्याचा संशय; क्रूर नवरा बायकोला फाशी देण्याची मागणी

Usgao Goa Crime: अमैराचा बळी घेतलेल्या त्या दाम्पत्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा देताना फाशीच द्यावी, असे तारा केरकर म्हणाल्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: कसलये तिस्क उसगाव येथील अमैरा या चिमुकलीची हत्या करणाऱ्या क्रूर दाम्पत्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी जोरदार मागणी कसलये उसगावच्या लोकांनी केली असून हा प्रकार तांत्रिक मांत्रिक प्रकरणाचाही भाग असू शकतो म्हणून पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा, अशी मागणी करत पोलिस ठाण्यावर धडक दिली.

या नागरिकांसमवेत सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर तसेच उसगाव गांजेच्या पंचसदस्य मनीषा उसगावकर आणि दुर्दैवी अमैराचे कुटुंबीय उपस्थित होते. या नागरिकांनी तारा केरकर आणि मनीषा उसगावकर यांच्यासह फोंड्याचे पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांची भेट घेतली.

अमैराचा बळी घेतलेल्या त्या दाम्पत्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा देताना फाशीच द्यावी, असे तारा केरकर यावेळी म्हणाल्या. प्रत्येकाला आपली संतती प्रिय असते. गरीब-श्रीमंत, हिंदू-मुस्लिम, ख्रिश्चन कोणीही असो, प्रत्येकाला आपल्या मुलांचा अभिमान असतो. परंतु अमैराच्या कुटुंबीयांसारखा वाईट प्रसंग कोणावरही येऊ नये. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गृहमंत्री असल्याने तसेच मंत्री विश्वजीत राणे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संशयितांना कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही मनीषा उसगावकर यांनी यावेळी केली. यावेळी अमैराचे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते. फोंडा पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांना त्वरित जेरबंद केल्याने येथील नागरिकांनी फोंडा पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

मांत्रिकाला जेरबंद करा !

मनीषा उसगावकर यांनी हा प्रकार तांत्रिक-मांत्रिकाचा असू शकतो, असे तेथील लोकांचे ठाम मत आहे. त्यामुळे त्या तांत्रिकाचा शोध पोलिसांनी लावावा. पोलिसांनी जर त्या तांत्रिक मांत्रिकाला पकडून आणले नाही, तर हे आक्रमक झालेले लोक त्याला पकडून पोलिसांच्या हवाली करतील, असे सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT