Vinod Palyekar Dainik Gomantak
गोवा

शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांचा राजीनामा; अपक्ष निवडणूक लढणार

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (Goa Forward Party) एकत्र आले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. यामध्ये काही इच्छुक नेत्यांना संधी मिळत आहे तर काही नेत्यांच्या पदरात फक्त निराशाच पडत आहे. पक्षाकडून तिकीट मिळाले नाही म्हणून बंडखोरी करणाऱ्या नेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातच आता शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे समोर येत आहे. (Vinod Palyekar Resignation News Updates)

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (Goa Forward Party) एकत्र आले आहेत. भाजपला घरी बसवण्याच्या हेतूने या दोन्ही पक्षांनी युती केली असल्याचे पक्षाचे नेते सांगत आहेत. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने डिलायला लोबो यांना शिवोलीची उमेदवारी दिली आहे. यामुळे गोवा फॉरवर्डचे विद्यमान आमदार विनोद पालयेकर नाराज झाले आहेत. पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.

मायकल लोबो (Michael Lobo) यांनी भाजप सोडून कॉंग्रेसचा हात धरला. भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. कॉंग्रेसने त्यांच्या पत्नी डिलायला लोबो यांना शिवोलीमधून उमेदवारी दिली आणि गोवा फॉरवर्डचे विद्यमान आमदार विनोद पालयेकर यांचे तिकीट कापले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT