डिचोली : डिचोलीतील भाजप उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. सभापती राजेश पाटणेकरांच्या गळ्यात भाजपकडून उमेदवारीची माळ घालण्यात आली आहे. डिचोलीत बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पाटणेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. (CM Pramod Sawant Declared Bicholim Candidate News Update)
सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती होती. कार्यकर्त्यांकडूनही राजेश पाटणेकर यांची मनधरणी सुरुच होती. मात्र पाटणेकर यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. मात्र आज अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पाटणेकर यांची भेट घेत त्यांना निवडणूक लढवण्यासाठी राजी केल्याचं दिसत आहे.
राजेश पाटणेकरांचा डिचोलीत मोठा जनसंपर्क आहे. त्यांनी निवडणूक लढवावी अशी सर्व डिचोलीवासियांची इच्छा असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी स्पष्ट केलं. दरम्यान मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना भाजपकडून डिचोलीतून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र उत्पल यांनी ती ऑफर धुडकावत आपण पणजीतूनच निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं होतं. उत्पल यांच्या या पवित्र्यानंतर भाजपने (BJP) डिचोलीतून राजेश पाटणेकरांचं नाव निश्चित केल्याचं आता समोर आलं आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.