Saptakoteshwar Temple Dainik Gomantak
गोवा

Saptakoteshwar Temple: शिवरायांनी केला जीर्णोद्धार तर वंशजांच्या हस्ते लोकार्पण, हा दुर्लभ योग!- फडणवीस

श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

Ganeshprasad Gogate

विविध धार्मिक विधीसह राजदैवत असलेल्या आणि छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला गुरुवारपासून अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला आहे.

या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांनी देवस्थानला भेट दिलीय. शिवकालीन इतिहास असलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सपत्नी श्रींवर अभिषेक केला.

या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या मंदिराचे फोटोसहित ट्वीट केलंय.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये असं म्हटलंय, "पोर्तुगिज तसेच बहामनी राजवटीत भारताचा देदीप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर, 1668 मध्ये आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिराची पुनर्बांधणी केली, ते गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर आज, 11 फेब्रुवारीपासून जीर्णोद्धारानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले होते आहे. गोव्याचे युवा आणि तडफदार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतजी यांचे मी मनापासून आभार मानतो.

मला विशेष आनंद आहे की, या जीर्णोद्धाराचे काम मुंबईतील वास्तुसल्लागार राहुल चेंबुरकर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण झाले. आपले वैभव जपण्याचा हा अतिशय गौरवास्पद क्षण आहे.

गोव्याचे 'राज दैवत' असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे आज लोकार्पण होते आहे आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या हस्ते. हा एक दुर्लभ योग आहे. महाराष्ट्र, गोवा आणि देशभरातील जनतेला मी यानिमित्त शुभेच्छा देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT