SIT to Investigate Shivaji Maharaj Statue vandalism At Karaswada-Acoi Mapusa Goa Dainik Gomantak
गोवा

शिवरायांच्‍या पुतळ्याची विटंबना; पोलिसांनी घेतले तिघांना ताब्‍यात, जमावाकडून दुकानांची मोडतोड

करासवाडा येथील घटना

दैनिक गोमन्तक

Shivaji Maharaj Statue vandalism At Karaswada-Acoi Mapusa Goa: करासवाडा-म्हापसा येथील आयडीसीच्या (थिवी औद्योगिक वसाहत) मुख्य गेटसमोरील रस्त्यालगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

शिवप्रेमींनी संयम बाळगून तसेच एकतेचे प्रतीक दाखवत सायंकाळी सिंहासनाधिष्ठीत नवीन पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्‍यात घेतले.

त्‍यानंतर मात्र संतप्त बनलेल्‍या जमावाने शिवपुतळ्याजवळील संशयिताच्या दुकानाची मोडतोड केली व म्हापसा पोलिस स्थानकाबाहेर गर्दी केली.

पुतळ्याची विटबंना झालेल्या चौथऱ्यावर सायंकाळी नवीन शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना करताना लोकप्रतिनिधींच्या समर्पित वृत्तीचे अनोखे दर्शन घडले.

Shivaji Maharaj Statue Vandalised At Karaswada-Acoi Mapusa

ख्रिस्‍तीधर्मीय आमदार कार्लुस फेरेरा यांनी शिवरायांच्‍या पुतळ्याला पुष्‍पहार अर्पण करून दुग्‍धाभिषेकही केला. हा विरळा प्रसंग धार्मिक एकोप्‍याचा संदेश देऊन गेला. त्‍यांच्‍यासह मंत्री सुभाष फळदेसाई, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही दुग्‍धाभिषेक केला.

दिवसभर घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. तसेच आयडीसीच्या गेटसमोर मोठ्या संख्येने शिवप्रेमी व हिंदू संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.

नवा पुतळा स्‍थापन; आमदार फेरेरांसह अन्‍य लोकप्रतिनिधींकडून दुग्‍धाभिषेक

या प्रकरणी तपासकामासाठी पोलिस महासंचालकांनी आज संध्याकाळी आदेश जारी करून विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना तपासकामाचा आढावा घेण्याचे व मार्गदर्शन करण्याचे निर्देशही दिले आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्‍हेगारांचा शोध घेण्‍याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने सरकारने त्याची गंभीर दखल घेत हे कृत्य करणाऱ्यांना गजाआड करण्याच्या सूचना पोलिस यंत्रणेला दिल्या आहेत.

या घटनेमुळे धार्मिक सलोखा राखण्याचे पोलिसांसमाेर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गोव्याच्या एकतेला बाधा पोहचू नये याची काळजी घ्यावी लागेल.

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणे म्हणजे, गोव्यातील शांतता व धार्मिक एकता बिघडवण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारांना थारा दिला जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्‍यात येईल."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

"छत्रपती शिवाजी महाराज हे माझे लहानपणापासून आदर्श आहेत. सर्वांनी राष्ट्रपुरुषांचा मानसन्मान केला पाहिजे. शिवपुतळ्याची विटंबना ही निंदनीय गोष्‍ट आहे. लोकांनी आज एकतेचे दर्शन घडविले."

- अ‍ॅड. कार्लुस फेरेरा, हळदोणेचे आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhuipal: रात्री येत होता घरी, जबरदस्ती गाडीत बसवण्याचा केला प्रयत्न; 12 वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा डाव फसला

Water Supply Revenue: पाणी गळती, नादुरुस्त मीटर्स! सरकारला 5 कोटींचा फटका; नासाडी थांबवण्यासाठी एजन्सीची नेमणूक

Aldona: संतापजनक! हळदोण्यात पाळीव कुत्र्याच्या जबड्यावर झाडली गोळी; स्थानिकांची कारवाईची मागणी

Raibandar Fire News: रायबंदरमध्ये आगीचे थैमान! 2 दुचाकी, 4 कार जाळून खाक; लाखोंचे नुकसान

Verca Fire News: वार्का 2 स्कूटरींक उजो, Video

SCROLL FOR NEXT