CM Pramod Sawant : गोव्याला उशिरा मुक्ती मिळण्यास काँग्रेस सरकार, पंतप्रधान नेहरूच जबाबदार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी मंत्री गोविंद गावडे यांना क्लिन चीट दिली आहे.
CM Pramod sawant
CM Pramod sawantDainik Gomantak
Published on
Updated on

येत्या ऑक्टोंबरपासून कला अकादमी सुरु करण्यात येणार आहे. नव्या निविदा जारी करुन खुल्या सभागृहाचे काम सुरु केले जाईल. मुख्यमंत्र्यांनी मंत्री गोविंद गावडे यांना क्लिन चीट दिली आहे. कला अकादमीच्या खुल्या सभागृहाचा स्लॅब कोसळला याला मंत्री गोविंद गावडे जबाबदार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

CM Pramod sawant
Karmal Ghat Accident : करमलघाटात भीषण अपघात; उभ्या ट्रकला दुचाकीची धडक

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, "बाणस्तारी पुलावरील अपघात दुर्देवी आहे. या अपघाताला पूर्णपणे मद्यधुंद चालकच जबाबदार आहे. सरकार सर्वच रस्त्यांवर पोलीस उभे करु शकत नाही. त्यामुळे स्थानिक आणि पर्यटकांनी स्वताहून वाहतूक नियम पाळावेत."

"गोव्याला उशिरा मुक्ती मिळण्यास तत्कालीन काँग्रेस सरकार आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरूच जबाबदार आहेत. 1955 मध्येच 'विजय ऑपरेशन' झाले असते तर गोव्याला अगोदर स्वातंत्र्य मिळाले असते."

नीलेश काब्राल, सुदिन ढवळीकर आणि रोहन खंवटे या तीन मंत्र्यांची विधानसभेतील कामगिरी उत्कृष्ट आहे. तर, विरोधकांमध्ये विजय सरदेसाई, कार्लूस फेरेरा आणि विरेश बोरकर यांची कामगिरी दर्जेदार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com