Shiv Sena in Goa  Dainik gomantak
गोवा

...तर शिवसेनेचा उमेदवार मागे घेईल; संजय राऊत

शिवसेना आणखी 3 उमेदवार जाहीर करणार

दैनिक गोमन्तक

पणजी : स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे गोव्यासाठीचे योगदान मोठे आहे. तरीही भाजपने त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारली आहे. हा त्याचा भाजपअंतर्गत विषय आहे. मात्र उत्पल भाजपच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असतील आणि निवडणुकीनंतर ते भाजपात जाणार नसतील तर शिवसेना पणजीतील आपली उमेदवारी माघारी घेईल असे मत शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. पणजीत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी पणजी बरोबर अन्य 9 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले. आणखी 3 उमेदवार जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले पणजी मतदारसंघांमधून शिवसेनेतर्फे शैलेंद्र वेलिंगकर निवडणूक लढवतील मात्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी भाजपच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि निवडून आल्यानंतर भाजपात (BJP) जाणार नाही असं जनतेला आश्वासन दिले तरच शिवसेना त्यांना पाठिंबा देईल आणि वेलिंगकर आपली उमेदवारी मागे घेतील आता पाठिंबा देण्याघेण्याचा बॉल उत्पल पर्रीकर यांच्या कोर्टात आहे यावर उत्पल ची भूमिका काय आहे हे लवकरच समजेल.

मात्र भाजपने उत्पल यांना उमेदवारी नाकारून गोव्याचे आणि देशाचे राजकारण ढवळून काढले आहे हे मात्र निश्चित. भाजपतर्फे पणजी मतदारसंघातून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वी आम आदमी पक्षाने पक्षात येवून पणजीतून निवडणूक लढवण्याची विनंतीही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT