Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

शिवसेनेचा विश्वजित राणे यांच्यावर 200 कोटींच्या औषध घोटाळ्याचा आरोप

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते शैलेंद्र वेलिंगकर यांनी हा आरोप केला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: शिवसेना नेते शैलेंद्र वेलिंगकर यांनी शुक्रवारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर 150 ते 200 कोटी रुपयांच्या औषध घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आम्ही राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपाल यांच्या कार्यालयांना पत्र लिहित आहोत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. (Vishwajit Rane News)

वेलिंगकर म्हणाले की, गोवा मेडिकल कॉलेजला (GMC) औषधांच्या पुरवठ्यासाठी जारी केलेल्या टेंडर संबंधित सर्व माहिती मी गोळा केली आहे. हे टेंडर 2018-19 मध्ये काढण्यात आले होते. या टेंडरची वैधता या वर्षीच संपली आहे.

पुढे बोलताना वेलिंगकर म्हणाले की, आरोग्यमंत्र्यांनी (Health Minister) या टेंडर मधील एका कलमात सुधारणा करून बोली लावणाऱ्या औषधी पुरवठादाराची 3 वर्षांची उलाढाल सध्याच्या 3 कोटींवरून 8 कोटी रुपये केली आहे.

जीएमसीच्या बाह्यरुग्ण विभागासाठी (ओपीडी) आवश्यक असलेल्या औषधांचा टेंडरमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, असेही वेलिंगकर म्हणाले. “याशिवाय आरोग्यमंत्र्यांनी आपत्कालीन परिस्थितीचा खोटा दावा करून औषधांची (Medicines) कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे आणि वेलनेस फॉरएव्हर या फार्मसीकडून ही औषधे फुगलेल्या किमतीत खरेदी केली आहेत ,” असे ते म्हणाले.

शिवसेना नेते शैलेंद्र वेलिंगकर हे पणजीतून निवडणूक लढणार होते. मात्र, अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT