Shishirotsav Goa Dainik Gomantak
गोवा

Shishirotsav Goa: पाेर्तुगिजांच्‍या आगमनापूर्वीपासून साजरा होणारा 'शिशिरोत्‍सव'! जांबावलीत सहा दिवस धूमधाम

Shishirotsav Zambaulim: या शिमग्याच्‍या नारळाचे पूजन आज कोंब-मडगाव येथील स्‍व. पुरुषोत्तम पांडुरंग केणी यांच्‍या घरात करण्‍यात आले.

Sameer Panditrao

मडगाव: मडगावची सर्वांत जुनी संस्‍था असलेल्‍या मठग्रामस्‍थ हिंदू सभा या संस्‍थेतर्फे जांबावलीच्‍या श्री रामनाथ दामोदर देवस्‍थानात साजरा केला जणाऱ्या सहा दिवसांच्‍या शिशिरोत्‍सवाची सुरुवात उद्या, २० मार्चपासून होणार आहे.

या शिमग्याच्‍या नारळाचे पूजन आज कोंब-मडगाव येथील स्‍व. पुरुषोत्तम पांडुरंग केणी यांच्‍या घरात करण्‍यात आले. गुरुवारी वाजत गाजत काढलेल्‍या मिरवणुकीने हा नारळ जांबावलीच्‍या दामाेदर देवस्‍थानात नेण्‍यात येईल. त्‍यानंतर या देवळातील शिशिरोत्‍सवाला सुरुवात होईल. जांबावलीचा प्रसिद्ध गुलालोत्‍सव २५ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.

मोहित केणी यांनी या शिमग्याच्‍या नारळाची विधिवत पूजा केली. यात भाविक भक्‍तिभावाने सहभागी झाले होते. मडगाव हे श्री दामोदराचे मूळ स्‍थान असे मानले जाते.

बाटाबाटीच्‍या काळात मडगावातून दामोदराची मूर्ती जांबावलीला हलविण्‍यात आली. पाेर्तुगिजांच्‍या आगमनापूर्वी दामोदर मंदिर मडगावात असताना हा शिशिरोत्‍सव मडगावात साजरा केला जायचा.

आता त्‍याच प्रथेचा एक भाग म्‍हणून शिमग्याच्‍या नारळाचे पूजन मडगावात केले जाते. त्‍यानंतर हा नारळ जांबावलीच्‍या दामोदर मंदिरात नेऊन या उत्‍सवाला सुरुवात होते.

तीन दिवस नाटकांचे प्रयोग

यानिमित्त शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस नाटकांचे प्रयोग होणार असून सोमवारी पहाटे ३ वाजता नाटकाचा प्रयोग सुरु होणार असून मंगळवार २५ मार्च रोजी गुलालोत्‍सव होणार आहे. त्‍यानंतर रात्री नवरदेवाची वरात आणि दुसऱ्या दिवशी २६ मार्च रोजी धुळपेट होऊन या शिशिरोत्‍सवाची सांगता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

SCROLL FOR NEXT