Shiroda Dainik Gomantak
गोवा

Shiroda News : वनस्पतींचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी : सुभाष शिरोडकर

Shiroda News : समर्पण आश्रम गोवाचा वर्धापनदिन उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

Shiroda News :

शिरोडा, आध्यात्मिक जीवनात माणसाचा संबंध निसर्गाशी येतो म्हणूनच आपल्या जीवनाशी निगडित असलेल्या वनस्पतींचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

कुमड-शिरोडा येथील योगप्रभा भारती सेवा संस्थानच्या समर्पण आश्रम गोवाच्या १२व्या वर्धापनदिन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून शिरोडकर बोलत होते.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, संस्थेचे प्रमुख आचार्य नवदास नाईक, आश्रम व्यवस्थापक नीलेश कवळेकर, दक्षिण भारत प्रबंधक राजेंद्र गावणेकर, आश्रम व्यवस्थापक सुप्रिया परमार, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक पालेकर, संध्या वस्त आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्‍थित होते.

पाहुण्यांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून या तपपूर्ती उत्सव कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दीपक पालेकर यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले. संध्या वस्त आणि सुप्रिया परमार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विराज प्रभुदेसाई, चंदन नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

गुरुमुळेच जीवन सुसह्य

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, आपले जीवन घडविण्याचे काम गुरू करतो. आपल्या जीवनाचा भवसागर पार करताना गुरूची विद्याच नावाडी ठरते. तेव्हाच कुठे आपले जीवन सुसह्य होते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने प्रत्येकाने कार्य करत राहावे. त्यामुळे समाजाबरोबरच आपलेही चांगले होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT