Shiroda water pipeline repair Dainik Gomantak
गोवा

Shiroda: आणि 'त्या' वृद्ध महिलेला मिळू लागले पाणी! शिरोड्यातील कनेक्शनचा गोंधळ मिटला; हक्क असल्याचा ‘मानवाधिकार’चा दावा

Shiroda News: शिरोडा येथील लता राजेंद्र नाईक हिने तिला पाणी कनेक्शनला नकार दिल्याची तक्रार आयोगाकडे दाखल केली होती. या वृद्धेला दिलासा मिळाला आहे.

Sameer Panditrao

पणजी: एक घरपट्टी असलेल्या घराला नळाचे एकच कनेक्शन सरकारच्या अधिसूचनेनुसार मिळू शकते. त्यामुळे घरात दोन कुटुंबे असली तरी वेगवेगळे पाणी कनेक्शन देता येत नाही. या मुद्यावरून शिरोडा येथील लता राजेंद्र नाईक हिचे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते.

तिने यासंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेत गोवा मानवाधिकार आयोगाने मध्यस्थी करून एका महिन्यात नळ जोडणी देण्याचे निर्देश साबांखा च्या पाणीपुरवठा विभागाला केली आहे. त्यामुळे या वृद्धेला दिलासा मिळाला आहे.

शिरोडा येथील लता राजेंद्र नाईक हिने तिला पाणी कनेक्शनला नकार दिल्याची तक्रार आयोगाकडे दाखल केली होती.

त्याची दखल घेत आयोगाने प्रतिवादी असलेल्या पीडब्ल्यूडी पाणीपुरवठा विभाग, शिरोडा पंचायत सचिव, शिरोडा वैद्यकीय अधिकारी व कृष्णनाथ विठ्ठल नाईक याना प्रतिवादी करू तत्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. तक्रारदार राहत असलेल्या घराचा क्रमांक तिचे सासरे विठ्ठल नाईक यांच्या नावावर आहे तर पाणी कनेक्शन तिचा दीर कृष्णनाथ नाईक याच्या नावावर आहे. या घराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे तिला दिलेले कनेक्शन तोडण्यात आले. तिने शिरोडा पंचायतीकडे पाणी कनेक्शनसाठी आवश्‍यक असलेला ना हरकत दाखला मागितला मात्र तो नाकारण्यात आला.

या घराला दुसरा क्रमाक असल्यास हे कनेश्‍न देता येते मात्र ती परिस्थिती तक्रारदाराच्या बाबतीत नाही. मात्र पाणी व वीज पुरवठा या अत्यावश्‍यक सेवा असून तो मानवी हक्क असून नाकारता येत नाही, असे आयोगाने निरीक्षण केले.

कृती अहवाल १६ जूनपर्यंत द्या!

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व तक्रारदार घराच्या काही भागात राहत असल्याने तिला पाण्याचा मानवी हक्क आहे. त्यामुळे तक्रारदाराला ती राहत असलेल्या घर क्रमांक ७९२ साठी आणखी पाणी कनेक्शन एका महिन्याच्या आत देण्याची शिफारस आयोगाने केली आहे. यासंदर्भात कोणती कृती करण्यात त्याचा अहवाल १६ जून २०२५ पर्यंत द्यावा असे नमूद करून ही तक्रार निकालात काढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT