Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Shiroda: नारीशक्तीला बरोबर घेऊन 'मराठी'ला राजभाषेचा मुकुट चढविणार, शिरोडा मेळाव्यात वेलिंगकरांचा निर्धार

Shiroda Marathi Rajbhasha Nirdhar Melava: ४० वर्षापूर्वी पेटविलेल्या ज्योतीला आपण येत्या दोन वर्षात प्रखर करून सरकाराला जागे करू, असे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी शिरोडा येथे स्पष्ट केले.

Sameer Panditrao

बोरी: महिलांनी गोव्याची अस्मिता व संस्कृती टिकविण्यासाठी मराठी राजभाषा आंदोलनात सहभागी व्हावे. कायदेशीर मार्गाने आंदोलन सुरू केले आहे, ४० वर्षापूर्वी पेटविलेल्या ज्योतीला आपण येत्या दोन वर्षात प्रखर करून सरकाराला जागे करू, असे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी शिरोडा येथे स्पष्ट केले.

शिरोडा येथील श्री रवळनाथ मंदिराच्या सभागृहात मंगळवारी मराठी राजभाषा निर्धार मेळाव्यात ग्राम समितीची निवड करुन सर्व नारी शक्ती व युवायुवतींना बरोबर घेऊन मराठी भाषेला राजभाषेचा मुकुट चढविणार, असे वेलिंगकर म्हणाले.

गोविंद देव म्हणाले, म्हापसा येथे पार पडलेल्या भाजपाच्या राज्य अधिवेशनात माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतलेल्या ठरावात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा लवकरात लवकर द्यावा. यावेळी श्रावणी नाईक यांनी पोवाडा गाऊन मराठीप्रेमीमध्ये उत्साह निर्माण केली.

वंदना पाटील यांनी उपस्थित वक्त्यांची ओळख करून दिली. मराठीचा उगम गोव्यात झाल्याचा दावा गो. रा. ढवळीकर यांनी केला आणि मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी सुभाष वेलिंगकर यांनी उपस्थित मराठीप्रेमींना प्रतिज्ञा दिली. आभार रुपेश नाईक यांनी केले. पसायदानाने निर्धार मेळाव्याची समाप्ती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT