Valpoi: 'येत्या 6 महिन्यांत सरकारला मराठीप्रेमींची ताकद दाखवू'! वेलिंगकरांचा एल्गार; वाळपईत मराठी राजभाषेसाठी मेळावा

Subhash Velingkar: सहा महिन्यांत प्रबळ संघटन फळी उभी करू. मराठी राजभाषा झाली नाही, तर गोवा विनाशाच्या दिशेने जाईल, असेही वेलिंगकर म्हणाले.
Subhash Velingkar, Goa Marathi Official Language Dispute
Subhash Velingkar, Goa Marathi Official Language Dispute Dainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: मराठी राजभाषेसाठी ही आरपारची निर्णायक लढाई आहे. मराठी भाषिकांनी प्रबळ शक्ती तयार करून येत्या सहा महिन्यांत लढा उभारून सरकारला जागा दाखवूया, असे प्रतिपादन निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.

मराठी राजभाषा निर्धार समिती गोवा सत्तरी तालुका विभाग मराठी कार्यकर्त्याचा प्रखंड मेळावा वाळपईत आज रविवारी सायंकाळी झाला. यावेळी गो. रा. ढवळीकर, गोमंतक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप केळकर, सदानंद काणेकर यांची उपस्थिती होती. प्रा. वेलिंगकर म्हणाले ही आर-पारची निर्णायक लढावी आहे. व तो निर्णय लागलाच पाहिजे.

राज्यात ८० टक्के मते ही मराठीप्रेमींची मिळतात. तर वीस टक्के मते अन्य मिळतात. त्यामुळे मराठी भाषिक मोठी ताकद आहे. गोव्यात या आधी १२० ग्रामपंचायतींनी मराठी राजभाषेविषयी ठराव घेतलेले आहेत. आपली दिशा मराठी भाषेची दिशा आहे. त्यामुळे हा निर्णायक लढा आहे. हे लोक आपल्याला मते देणार हा भ्रम संपवला पाहिजे. सहा महिन्यांत प्रबळ संघटन फळी उभी करू. मराठी राजभाषा झाली नाही, तर गोवा विनाशाच्या दिशेने जाईल, असेही वेलिंगकर म्हणाले.

Subhash Velingkar, Goa Marathi Official Language Dispute
Mandrem: गोव्याचे भवितव्य घडवायचे असेल तर 'मराठी' राष्ट्रीय संस्कृती झाली पाहिजे; मांद्रेतील मेळाव्यात वेलिंगकरांचे प्रतिपादन

गो.रा.ढवळीकर म्हणाले, इंग्रजी भाषेचा समूळ उच्चाटन करून प्राथमिक शिक्षण मराठी भाषेतून झाले पाहिजे. सत्तरीत काहीजण येऊन उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना एकत्र करून मराठी भाषा कशी आमची भाषा नाही, हे मुद्दामहून सांगितले जाते. मराठीचा चुकीचा इतिहास सांगितला जातो. युवकांना पकडून हे काम केले जात आहे.

डॉ. अनुजा जोशी यांनी प्रास्ताविक केले. हनुमान मंदिरात देवाला सार्वजनिक सांगणे उदय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विजय नाईक यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी अभिजात मराठी भाषा गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे, असा निर्धार सर्व उपस्थितांनी करून शपथ घेतली. गणपतराव राणेंनी सूत्रनिवेदन केले. गणेश माटणेकर यांनी आभार मानले.

Subhash Velingkar, Goa Marathi Official Language Dispute
Marathi Language: कायदा आणला म्हणून भाषांचा विकास होतो? भाषिक चळवळ लोकांना जीवनाशी निगडित विषय वाटत नाही

सत्तरीतून शक्ती उभी करू!

अडवाणींच्या काळात देखील भाजपने गोव्यात भाजपच्या अधिवेशनावेळी भाजप सरकार आल्यास मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचा ठराव संमत केला होता. सत्तेनंतर मात्र भाजपला दक्षिणेकडे लक्ष देऊन मराठीला विसरण्यात आले. संदीप केळकर हा अत्यंत अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. मराठीसाठी सत्तरी तालुक्यातून शक्ती उभी करूया, असे केळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com