Shiroda Dainik Gomantak
गोवा

Shiroda News : शिरोडा-शिदोट्टेत बांध फुटला; नदीचे पाणी घुसले शेतात

Shiroda News : याप्रकरणी कृषी खात्याने त्वरित लक्ष देऊन या भागातील शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा तळपण - शिरोडा भागातील शिदोट्टे भाटी, नागले भाट या ठिकाणी बांध फुटून झुआरी नदीचे पाणी शेतीत घुसल्याने शेतीची नासाडी झाली आहे. ही घटना काल रात्री घडली असून शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

याप्रकरणी कृषी खात्याने त्वरित लक्ष देऊन या भागातील शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या वर्षीही अशीच घटना घडली होती, त्यावेळेलाही बांध फुटून नदीचे पाणी शेतीत घुसले होते, त्यानंतर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनही केले होते, सरकारी यंत्रणेने त्यानंतर याप्रकाराची दखल घेतली होती, पण यंदाही तोच प्रकार झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शिदोट्टे व लगतच्या भागात शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेती आहे, मात्र बांध फुटण्याच्या प्रकारामुळे ही शेती ओस पडण्याच्या मार्गावर आहे. गेले काही दिवस कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे त्यातच नदीला भरती आल्याने बांध फुटल्याचे समजते. फुटलेल्या बांधातून नदीचे पाणी शेतीत घुसल्याने या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी रोखू शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hyderabad Drugs Case: हैदराबादमध्‍ये 'ड्रग्‍स पार्टी' आयोजनात गोवा कनेक्‍शन उघड! डीजे क्लिंटनवर संशय; 12 जणांना अटक

Mirabag: 49 दिवसांचा लढा यशस्वी! मीराबाग बंधारा रद्द; ‘त्‍या’ चौघांवरील तक्रारीही मागे घेणार, CM सावंतांची घोषणा

Soham Naik: 'सोहम नाईक'च्‍या अडचणी वाढल्‍या! सज्ञान महिलेसह 5 FIR दाखल; जामीन मिळणे झाले अवघड

Rashi Bhavishya: भाग्योदय होणार! मार्च एंडिंग ठरणार 'या' राशींसाठी खास; आर्थिक स्थितीत होणार बदल

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

SCROLL FOR NEXT