Soham Naik: 'सोहम नाईक'च्‍या अडचणी वाढल्‍या! सज्ञान महिलेसह 5 FIR दाखल; जामीन मिळणे झाले अवघड

Curchorem Sex Scandal: संपूर्ण राज्‍यभर सध्‍या गाजत असलेल्‍या कुडचडे येथील लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण पाच ‘एफआयआर’ नोंदविले आहेत.
Soham Naik Curchorem Scandal
Soham Naik Curchorem ScandalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: संपूर्ण राज्‍यभर सध्‍या गाजत असलेल्‍या कुडचडे येथील लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण पाच ‘एफआयआर’ नोंदविले आहेत. यामध्ये एका १८ वर्षांवरील सज्ञान महिलेने तक्रार दाखल केल्याने संशयित सोहम नाईक (२०) याच्‍या अडचणी आणखी वाढल्‍या आहेत. गेल्‍या पाच वर्षांपासून तो मुलींना फिरवत होता, त्‍यांचे शोषण करत होता. सद्यःस्थितीत त्याला जामीन मिळणे कठीण असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोहम नाईक हा अकरावीपासूनच मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करत होता, त्यांचे खासगी फोटो व्हायरल करत होता. गेल्या पाच वर्षांपासून तो अशा कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे. जाणीवपूर्वक मुलींशी संवाद साधून त्यांचा विश्‍‍वास तो संपादन करायचा.

जी मुलगी त्याच्याशी साधेपणाने किंवा प्रेमाने वागायची, तिलाच तो लक्ष्य करायचा. मुलगी श्रीमंत असावी किंवा दिसायला आकर्षक असावी, असा कोणताही निकष त्याच्याकडे नव्हता. तर, केवळ संवादातून जवळीक साधून तिचा गैरफायदा घेणे, ही त्‍याची कार्यपद्धती होती.

सोहमविरोधात शाळा तसेच महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या सोहमने अनेक मुलींशी संबंध प्रस्थापित करून त्यांचे लैंगिक शोषण केले. तो मुलींसोबत खासगी फोटो काढून आपल्‍या मित्रांना दाखवत असे आणि ‘‘मी किती मुलींना फिरवतो ते बघा’’ अशी बढाई मारत असे. त्यामुळे मित्रमंडळींमध्ये त्याची ओळख ‘मुलींना फिरवणारा’ अशी होती.

जामीन मिळणे खूप कठीणच

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, पाचव्या तक्रारीमुळे (सज्ञान महिला) सोहम नाईक याच्‍या गळ्‍याभोवती कायद्याचा फास आणखी आवळला गेला आहे. परिणामी त्याला जामीन मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. या सर्व प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Soham Naik Curchorem Scandal
Soham Naik: कुडचडेतील 'सेक्स स्कँडल' प्रकरणाची व्याप्ती वाढली! 3 तक्रारी दाखल; सोहम नाईकच्या अडचणी वाढल्या

मित्राचीही चौकशी

सोहम हा काही मुलींना आपल्या मित्राच्या घरी घेऊन जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्‍यामुळे या प्रकरणात मित्राचा सक्रिय सहभाग किंवा सहकार्य आढळल्यास त्यालाही सहआरोपी म्हणून अटक होऊ शकते. त्‍या अनुषंगाने पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

Soham Naik Curchorem Scandal
पुन्हा एकदा एक 'ज्वलंत प्रश्न' ऐरणीवर आणला आहे - तो म्हणजे सायबर विश्वातील महिला आणि अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेचा..

नोंदवलेल्या तक्रारींचे स्वरूप

१ पहिली तक्रार : वर्तमानपत्रातील वृत्ताची दखल घेऊन पोलिसांनी स्वतःहून एफआयआर नोंदवला.

२ दुसरी व तिसरी तक्रार : दोन अल्पवयीन मुलींनी लैंगिक शोषणाबाबत केली तक्रार.

३ चौथी तक्रार : खासगी फोटो काढून ते व्हायरल केल्याचा आरोप.

४ पाचवी तक्रार : एका सज्ञान महिलेची तक्रार; घटनेवेळी दोघेही होते सज्ञान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com