Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Amit Shah Lok Sabha Speech Naxalism: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
Amit Shah Lok Sabha Speech Naxalism
Amit ShahDainik Gomantak
Published on
Updated on

Amit Shah Lok Sabha Speech Naxalism: देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर सोमवारी (30 मार्च) लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. भारत आता नक्षलवादाच्या अंताच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा विश्वास व्यक्त करत शाह यांनी काँग्रेसच्या शासनकाळातच नक्षलवादाला फोफावण्याची संधी मिळाली, असा गंभीर आरोप केला.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी अमित शाह यांनी घोषणा केली होती की, 31 मार्च 2026 पर्यंत देशातून डाव्या विचारसरणीचा उग्रवाद पूर्णपणे संपवला जाईल. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नक्षलवाद्यांविरुद्ध राबवण्यात आलेल्या मोठ्या कारवाईचा पाढाच सभागृहात वाचला.

अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेसच्या 75 वर्षांच्या प्रवासावर बोट ठेवत म्हटले की, यापैकी 60 वर्षे काँग्रेस सत्तेत होती, परंतु नक्षलप्रभावित भागातील आदिवासींच्या कल्याणासाठी त्यांनी कधीही ठोस पावले उचलली नाहीत. दशकानुदशके या भागातील आदिवासींपर्यंत पक्की घरे, स्वच्छ पाणी, रेशन कार्ड आणि आधार कार्ड यांसारख्या मूलभूत सुविधा का पोहोचल्या नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नक्षलवाद केवळ गरिबीमुळे पसरला नाही, तर एका विशिष्ट डाव्या विचारसरणीमुळे त्याला खतपाणी घातले गेले, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Amit Shah Lok Sabha Speech Naxalism
Amit Shah Goa: 'पर्रीकरांची आठवण, काँग्रेसला चिमटे, स्वदेशीचा नारा'; अमित शहांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे वाचा..

आपल्या भाषणात त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या कार्यकाळाचा उल्लेख केला. 70 च्या दशकात राजकीय फायद्यासाठी डाव्या विचारसरणीचा स्वीकार करण्यात आला आणि तिथूनच नक्षलवादाची बीजे पेरली गेली, असे ते म्हणाले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 'नक्षलवाद ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील सर्वात मोठी समस्या आहे' असे मान्य केले होते, मात्र त्यांच्याकडे याविरोधात निर्णायक कारवाई करण्याची इच्छाशक्ती नव्हती, असा टोलाही शाह यांनी लगावला. इतकेच नाही तर, राहुल गांधींवर निशाणा साधताना गृहमंत्री म्हणाले की, राहुल गांधी स्वतः नक्षलवादी समर्थकांसोबत अनेकदा दिसून आले आहेत.

Amit Shah Lok Sabha Speech Naxalism
Amit Shah: अमित शहांच्या हस्ते 2451 कोटींच्या विकासकामांची होणार सुरुवात! मुखर्जी स्टेडियमवर 10 हजार लोक जमणार; वाहतूक मार्गात मोठे बदल

डाव्या पक्षांवर टीका करताना शाह म्हणाले की, आजचे नक्षलवादी हे त्याच CPI (ML) विचारसरणीचे अपत्य आहेत, ज्यांनी परकीय माओवादी विचारधारेला आपला आदर्श मानले. नक्षलवाद्यांचे आदर्श 'भगतसिंग' किंवा 'बिरसा मुंडा' नसून विदेशी विचारवंत आहेत, असा कटाक्ष त्यांनी केला. छत्तीसगडमधील बस्तरचे उदाहरण देताना ते म्हणाले की, जो भाग कधी काळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला होता, तो आता जवळपास मुक्त झाला. मोदी सरकारने तिथे शाळा, रेशन दुकाने उघडली असून सुरक्षा दलांच्या तैनातीमुळे नक्षलवाद्यांना मागे हटावे लागले. आता 31 मार्च 2026 ही या समस्येच्या समाप्तीची अंतिम रेषा असेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Amit Patkar Goa Congress
home minister amit shah reviews goa st reservation file
Amit Patkar Congress Criticism PM Modi
Amit Shah Smart Border Model Plan
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com