Shirgao tragedy report Dainik Gomantak
गोवा

Shirgao Stampede: तथ्य शोध समितीचा अहवाल; शिरगाव चेंगराचेंगरीत माजी उत्तर गोवा एसपी, जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीला धरले जबाबदार

Shirgao Stampede Fact Finding Committee Report: या अहवालात उत्तर गोव्याचे माजी पोलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि माजी उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते यांच्यासह अनेक जणांना या दुर्घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले

Akshata Chhatre

डिचोली: श्री देवी लईराई जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या तथ्य शोधक समितीने अहवाल सादर केला आहे. या अहवालात उत्तर गोव्याचे माजी पोलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि माजी जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते यांच्यासह अनेक जणांना या दुर्घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले आहे.

महसूल सचिव संदीप जाक्वेस यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने शुक्रवारी (दि.9) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापाशी घटनेचा अहवाल सादर केला. या अहवालात निरीक्षणे, निष्कर्ष आणि शिफारशींचा समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तथ्यशोधक समितीने माजी उत्तर गोवा एसपी, माजी उत्तर गोवा जिल्हाधिकारी, देवस्थान समिती, पंचायत, पंचायत सचिव, माजी उपजिल्हाधिकारी, माजी उपअधीक्षक पोलीस आणि डिचोलीचे माजी पोलीस निरीक्षक यांच्यासह इतरांना चेंगराचेंगरीसाठी जबाबदार ठरवले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीये. अहवालातील निष्कर्षांची सरकार तपासणी करत असून, या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर आवश्यक कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी, चेंगराचेंगरीच्या प्राथमिक चौकशी करण्यासाठी राज्यसरकारने स्नेहा गित्ते, अक्षत कौशल यांच्यासह डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी, डिचोलीचे पोलीस निरीक्षक दिनेश गाडेकर आणि डिचोलीचे उपजिल्हाधिकारी भीमानाथ खोरजुवेकर यांची तातडीने बदली केली होती.

शिरगाव येथे पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा लोकांचा मृत्यू झाला, तर ७४ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये दोन महिला आणि एका १६ वर्षीय मुलाचा समावेश होता. ५ मे पासून सुरू झालेल्या पाच दिवसांच्या जत्रेच्या दुसऱ्या दिवशी ही दुर्घटना घडली. जखमींपैकी काहीजण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. या अहवालामुळे आता प्रशासकीय पातळीवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT