Lairai Jatra Shirgao: Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatra: जत्रा पार पडली, आता स्वच्छतेचे आव्हान! शिरगावात कचऱ्याचे ढीग, पंचायतीसमोर प्रश्नचिन्ह

Lairai Jatra Shirgao: शिरगावच्या श्री लईराई देवीची जत्रा पार पडली. या जत्रोत्सवानंतर आता शिरगावसमोर ''मिशन चकाचक'' चे आव्हान निर्माण झाले आहे.

Sameer Panditrao

डिचोली: शिरगावच्या श्री लईराई देवीची जत्रा पार पडली. या जत्रोत्सवानंतर आता शिरगावसमोर ''मिशन चकाचक'' चे आव्हान निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जत्रा काळात शिरगावात प्रचंड प्रमाणात प्लास्टिक आदी कचरा निर्माण झाला असून विविध ठिकाणी विखुरलेला कचरा हटवून गाव ‘चकाचक’ करण्याचे स्थानिक पंचायतीसमोर आव्हान आहे. हा प्रचंड कचरा हटविण्याचा पंचायतीवर ताण येणार आहे.

शिरगावच्या श्री लईराई देवीची जत्रा ही सर्वात मोठी जत्रा म्हणून ओळखण्यात येत आहे. या जत्रेला लहान-सहान मिळून दरवर्षी दुकानांची मोठी फेरी भरत असते. त्यातील बहूतेक दुकानांमधून चार ते पाच दिवस व्यवसाय चालत असतो. यंदा फेरीत पाचशेहून अधिक दुकाने थाटण्यात आली होती.

जत्रेनिमित्त धोंड मिळून लाखो भाविक शिरगावात येतात. त्यामुळे खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. साहजिकच जत्रा काळात प्रचंड प्रमाणात कचरा साचत असतो. यंदाही शिरगावात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. जत्रेनंतर चार दिवस साजरा झालेल्या कौलोत्सवामुळे कचरा हटविण्याचे काम करणे अडचणीचे बनले होते.

चार-पाच टन कचरा

जत्रा काळात यंदा गावात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. वडाचावाडा परिसरात तर मोकाट गुरे कचऱ्यावर ताव मारताना दिसून येत आहे. यंदा शिरगावात किमान चार ते पाच टन कचरा संकलित होण्याचा अंदाज आहे. आता कधी एकदाची कचरा हटाव मोहीम राबविण्यात येते, त्याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT