Goa Resort Dainik Gomantak
गोवा

Shilpa Shetty Goa Resort: शिल्पा शेट्टीने गोव्यात आणला 'पिरॅमिड इफेक्ट', मोरजीत 1.5 एकर जागेत 'बॅस्टियन रिव्हिएरा'ची जोरदार सुरुवात Watch Video

Bastian Hospitality Expansion: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची सह-मालकी असलेल्या बॅस्टियन हॉस्पिटॅलिटी ग्रुपने गोव्यात एक मोठा प्रोजेक्ट सुरु केला.

Manish Jadhav

मोरजी: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची सह-मालकी असलेल्या बॅस्टियन हॉस्पिटॅलिटी ग्रुपने गोव्यात एक मोठा प्रोजेक्ट सुरु केला. मोरजी येथील बॅकवॉटर जवळ 1.5 एकर जागेवर त्यांनी 'बॅस्टियन रिव्हिएरा' नावाचे रिसॉर्ट सुरु केले.

बॅस्टियन ग्रुपची सुरुवात मुंबईतील रेस्टॉरंट म्हणून झाली होती, पण आता त्यांनी फक्त रेस्टॉरंट्सपुरते मर्यादित न राहता एक मोठी हॉस्पिटॅलिटी ओळख निर्माण करण्याचे ठरवले आहे. हा प्रोजेक्ट त्याचेच द्योतक आहे. गोव्यातील (Goa) लक्झरी पर्यटनाला आकर्षित करण्यासाठी हे रिसॉर्ट सुरु करण्यात आले आहे. हे ठिकाण सामान्य रिसॉर्टसारखे नसून खूप आकर्षक आणि आधुनिक पद्धतीने डिझाइन केलेले आहे.

संस्थापकांचे गोव्याशी खास नाते

बॅस्टियनचे संस्थापक आणि सीईओ रणजीत बृंदा यांनी सांगितले की, गोव्याशी त्यांचे जुने आणि खास वैयक्तिक नाते आहे. त्यातूनच 'बॅस्टियन रिव्हिएरा'ची कल्पना साकारली. भविष्यात या ठिकाणी स्पा आणि आरोग्य सुविधा सुरु करण्याचीही त्यांची योजना आहे.

अद्वितीय डिझाइन आणि खास खाद्यसंस्कृती

'बॅस्टियन रिव्हिएरा'ची रचना आंतरराष्ट्रीय पद्धतीची आहे. याच्या डिझाइनमध्ये इजिप्त, मायकोनोस, दुबई अशा अनेक ठिकाणांची प्रेरणा घेण्यात आली आहे. येथे मध्यभागी पिरामिडसारखी एक खास रचना आहे, ज्याच्याभोवती आरामदायक कॅबाना, गोलाकार सनबेड्स आणि बॅकवॉटरच्या दिशेने तोंड केलेला मोकळ्या हवेतील बार आहे. येथील मेन्यूमध्ये बॅस्टियनचे सर्वोत्तम पदार्थ तर असतीलच, पण त्यासोबत उत्कृष्ट सीफूड्स आणि स्थानिक पदार्थांचाही खास समावेश असेल. डिसेंबर महिन्यात जिमी जूल्स आणि बेदौईन यांसारखे आंतरराष्ट्रीय कलाकार येथे परफॉर्म करणार आहेत.

बॅस्टियन ग्रुपची वाटचाल

बॅस्टियन हॉस्पिटॅलिटी ग्रुपने 2016 मध्ये मुंबईतील वांद्रे येथे पहिले 'बॅस्टियन' रेस्टॉरंट सुरु केले. त्यानंतर त्यांनी दादर येथे 'बॅस्टियन ॲट द टॉप' आणि नंतर बंगळूरुमध्येही त्यांची शाखा उघडली. याच वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी वांद्र्यातील त्यांचे मूळ रेस्टॉरंट बंद केले, पण इतर ठिकाणी त्यांचा विस्तार सुरुच आहे. गोव्यात शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) वगळता अन्य काही सेलिब्रिटींनी देखील आपले व्यवसाय सुरु केले आहेत, ज्यात सचिन जोशी यांचे 'प्लॅनेट हॉलिवूड बीच रिसॉर्ट', विराट कोहलीचे 'वन8 कम्युन' आणि अमृता अरोराचे 'जोलीन बाय द सी' यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT