Goa Shigmotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023 : मांद्रेत 21 रोजी शिगमोत्सवाची धूम; चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

चित्ररथ स्पर्धेसाठी एक लाखाचे बक्षीस

दैनिक गोमन्तक डिजिटल

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि उदरगत संस्था मांद्रे, यांच्या संयुक्त विद्यमाने मांद्रेत भव्य शिगमोत्सव चित्ररथ मिरवणूक मंगळवार दि.21 रोजी निघणार आहे,अशी माहिती आमदार जीत आरोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तब्बल चार दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यासाठी अखिल गोवा पातळीवरील चित्ररथ स्पर्धेसाठी एक लाखाचे बक्षीस, शिवाय रोमटामेळ स्पर्धेसाठी रु. 80 हजार, लोक नृत्यसाठी रु.३० हजार, वेशभूषा स्पर्धेसाठी रु.२० हजार , तर पेडणे तालुका मर्यादित स्पर्धेसाठी रु. १० हजार, अशी बक्षिसे आहेत.

शिवाय ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटक आयोजित केले आहेे. मंगळवार दि. २१ रोजी ५ वा.श्री भगवती सप्तेश्वर मंदिर प्रांगणातून चित्ररथ, रोमटामेळ ,लोक नृत्य मिरवणूक होईल.

मांद्रे पंचायत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मांद्रे महोत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश सावंत, उपाध्यक्ष सरपंच अमित सावंत, प्रवीण वायंगणकर , नरेंद्र शेटगावकर , लक्ष्मीकांत गवंडी, सचिव दयानंद मांद्रेकर सचिव सागर तिळवे ,खजिनदार प्रदीप हडफडकर, पंच किरण सावंत आदी उपस्थित होते.

सांगितीक कार्यक्रमांची रेलचेल

१९ रोजी सायंकाळी ७ वा. ग्रामपंचायत पटांगणावर ‘क्षितिज स्वरांचे’ गायक सन्मिता धापडे शिंदे, मुंबई आणि चैतन्य कुलकर्णी यांचा सहभाग असेेल. २० मार्च रोजी ७ वा. गायक स्वप्निल बांदोडकर यांचा कार्यक्रम, त्यात संपदा माने आणि समृद्ध चोडणकर हे सहगायक सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT