Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : शिगाव परिसरात गव्यांकडून बागायतीची नासधूस, शेतकरी चिंतेत

Goa news : गव्यांचा कळप रात्री तसेच दिवसाही बागायतीत शिरतो व नुकसान करतो. कर्ज काढून आपण बागायत उभी केली आहे. परंतु रानटी जनावरांमुळे मोठे नुकसान होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कुळे, खैरीमळ, बिंबल-शिगाव येथील शेतकरी शशिकांत विष्णू वेळीप यांच्या बागायतीत असलेल्या सुपारीच्या झाडांची गव्यांनी नासधुस केली आहे.

२० ते २५ सुपारीची झाडे आडवी केली आहेत. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसलेला असल्याचे वेळीप यांनी सांगितले.

गव्यांचा कळप रात्री तसेच दिवसाही बागायतीत शिरतो व नुकसान करतो. कर्ज काढून आपण बागायत उभी केली आहे. परंतु रानटी जनावरांमुळे मोठे नुकसान होत आहे.

वन खाते रानटी जनावरांना आवरण्यासाठी कोणत्याही उपाय योजत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे जड जाऊ लागले आहे. या संदर्भात आपण अनेकदा वन खात्याकडे तक्रारी केल्या परंतु आजवर एकाही अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केलेली नाही. सरकारने योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वेळीप  यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CP Radhakrishnan: सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ, धनकड यांनीही लावली हजेरी

Bits Pilani: गोवा बनतेय ‘ड्रग्‍सची राजधानी’! बिट्स पिलानीवरून चिंता व्यक्त; इतर महाविद्यालयांतही तपासणीची मागणी

Surla Kulem: सुर्ला, कुळेतील ईको-पर्यटन प्रकल्पांवरील कामे थांबवा! उच्च न्यायालयाचा आदेश; 6 आठवड्यांत मागितला अहवाल

Goa Rain: 3 दिवस पावसाचा इशारा! मध्यम सरी कोसळणार; राज्यात 'यलो अलर्ट' जारी

Codar IIT Project: 'आयआयटी'ला तीव्र विरोध! कोडारवासीयांची सह्यांची मोहीम; मंत्री सुभाष शिरोडकर यांना निवेदन

SCROLL FOR NEXT