Goa IIT Update: शेळ मेळावली येथील सातेरी देवस्थानात आज पत्रकार परिषदेत बोलताना शंकर नाईक व मेळावली ग्रामबचाव आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर व इतर पदाधिकारी Dainik Gomantak
गोवा

गोवा निवडणूकीचे बिगूल वाजल्याने IIT आंदोलनाला स्थगिती

निवडणूक झाल्यानंतर परत मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा

प्रेमानंद नाईक

गुळेली: शेळमेळावली येथील आय आय टी आंदोलकांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक जाहीर झाल्यामुळे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना मेळावली ग्रामबचाव आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर म्हणाले की काल निवडणूक आयोगाने गोव्यात निवडणूक तारीख जाहीर केली त्यामुळे आज पासून कोड लागल्याकारणाने आम्ही आमचे आंदोलन निवडणूक होई पर्यंत स्थगित करत आहेत.(Goa IIT Update Shel Melauli IIT agitation postponed due to announcement of Goa elections)

निवडणूक (Goa Assembly Election) संपन्न झाल्यानंतर परत मोठ्या ताकदीनिशी आम्ही हे आंदोलन पुढे नेणार आहेत आमच्या वर घातलेले खटले,त्याच बरोबर आमच्या जमीनींचा प्रश्न हे सरकारने (Goa Government) सोडवले नाही पुढचे सरकार कुणाचेही येवो आम्ही आमचे आंदोलन चालू ठेवणार आहे.

या समितीचे पदाधिकारी शंकर नाईक म्हणाले की 19 डिसेंबर पासून आम्ही आंदोलन सुरू केले आहे सरकारने आमच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करतो.भाजपा (BJP) सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार नाही त्यांना सर्वसामान्य जनतेचे काहीच पडून गेलेले नाही.आमच्या मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार आहे सध्या फक्त निवडूकीमुळे स्थिगत करत आहोत. यावेळी इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: 'भाऊबीजेची ओवाळणी ठरली शेवटची'! गोव्यातून परत येताना दुचाकी झाडावर आदळली; 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Birsa Munda Jayanti: भगवान 'बिरसा मुंडांच्या' 150 व्या जयंतीसाठी गोव्यात तयारी सुरू, तालुकावार जागृती कार्यक्रमांचे आयोजन

Watch Video: ताळगावमध्ये पावसाचं थैमान! स्कोडा शोरूमजवळ फूटपाथ कोसळला; रस्ता तात्काळ 'बंद'

'आम्ही पुढच्या वेळी फुकेटला जाऊ',पर्यटकांचा गोव्याला रामराम, टॅक्सी माफियांची दादागिरी; Video Viral

शेतकऱ्यांसमोर पुन्‍हा एकदा संकट! उरले सुरले पीकही हातचे जाण्याची भीती; म्हैसाळ धरण दुसऱ्यांदा भरले

SCROLL FOR NEXT