Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident:वेगाने केला घात; पंचवाडी येथील अपघातात सांगेचा युवक ठार

मापा पंचवाडी येथे दुचाकीचा अपघात

गोमन्तक डिजिटल टीम

मापा पंचवाडी येथे दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात सांगेचा युवक ठार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. युवकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

( Shashi Gaonkar dies in accident at Mapa Panchwadi )

मिळालेल्या माहिती नुसार सांगे येथील शशी गावकर (वय 25) हा सावर्डे तालुक्यातील पंचवाडी मुख्य मार्गाने प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान मापा (Mapa Panchwadi ) येथे आला असता गावकर याचा अपघात झाला. या अपघातात गावकर याचा दुचाकीवरील ताबा सुटला त्यामूळे दुचाकी मुख्य मार्ग सोडत मार्गालगतच्या खड्ड्यात वेगाने आदळली. यात तो गंभीर जखमी झाला.

अपघात घडताच मार्गावरील वाहनचालकांनी गावकर याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गावकर याचा त्यापुर्वीच मृत्यू झाला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातावेळी गावकर याच्या दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि यामुळेच तो खड्ड्यात जोराने आदळल्याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT